नातीचे लैंगिक शोषण करणा-या आजोबाला पुण्यात अटक
By Admin | Updated: January 30, 2017 15:34 IST2017-01-30T15:33:54+5:302017-01-30T15:34:36+5:30
काही वर्षांपूर्वी या मुलीच्या आई-वडिलांचे निधन झाले. मुलीच्या शिक्षकांनी लगेचच चाईल्ड हेल्पलाईनवरुन या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी आजोबाला अटक केली.

नातीचे लैंगिक शोषण करणा-या आजोबाला पुण्यात अटक
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 - नातीचे लैंगिक शोषण करणा-या 79 वर्षीय आजोबाला पुणे पोलिसांनी रविवारी अटक केली. याच प्रकरणात पोलिसांनी मुलीचे काका आणि काकी विरोधातही स्वतंत्र गुन्हा नोंदवला. या मुलीने खासगी शिकवणी क्लासच्या शिक्षकांकडे या प्रकाराची वाच्यता केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उजेडात आले.
काही वर्षांपूर्वी या मुलीच्या आई-वडिलांचे निधन झाले. मुलीच्या शिक्षकांनी लगेचच चाईल्ड हेल्पलाईनवरुन या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी आजोबाला अटक केली.
पीडित मुलगी पुण्यामध्ये आईकडच्या नात्यातील काका-काकींकडे राहत होती. या मुलीचे आजोबा अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे रहिवासी आहेत. प्रत्येकवेळी पुण्याला आल्यानंतर आजोबा आपले लैंगिक शोषण करायचे अशी तक्रार या मुलीने केली आहे. मी काका-काकींनाही याबद्दल सांगितले पण त्यांनी दुर्लक्ष केले असे या मुलीने तक्रारीत म्हटले आहे.