आजीनेच केली चिमुरड्या नातीची हत्या
By Admin | Updated: August 16, 2014 19:21 IST2014-08-16T15:14:20+5:302014-08-16T19:21:18+5:30
महिलेने आपल्या नातीचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप करणा-या आजीनेच स्वत:च्या नातीला ठार मारल्याचे धक्कादायक सत्य पोलिस चौकशीतून समोर आले आहे.

आजीनेच केली चिमुरड्या नातीची हत्या
ऑनलाइन टीम
बदलापूर, दि. १६ - एका महिला आपल्या अडीच वर्षांच्या नातीला हिसकावून घेऊन पळून गेली व तिची हत्या झाली असा आरोप करणा-या आजीनेच आपल्या नातीची हत्या केल्याचे धक्कादायक सत्य पोलिस चौकशीतून उघडकीस आला आहे.नात गतीमंद होती, लोकं तिला नाव ठेवायचे, काहीबाही बोलायचे, ते ऐकून त्रस व्हायचा म्हणून आजीनेच तिचे जीवन संपवले. या निर्यी आजीला अटक करण्यात आली आहे.
मंगला बोरसे असे या महिलेचे नाव असून केतकी हिरे असे मृत बालिकेच नाव आहे. काल संध्याकाळी अडीच वर्षीय केतकीचा मृतदेह कात्रप परिसरातील नाल्यात सापडला होता. केतकी ही गतिमंद होती, तिचे आई- वडील सकाळी लौकर कामाला जात असल्याने तिची आज्जी ( आईची आई) तिचा सांभाळ करत असे. मात्र नातीला लोकं नाव ठेवत असतं, बोलत असत, या जाचाला कंटाळून बोरसे यांनीच तिला नाल्यात फेकून दिले. व त्यानंतर नातीच्या अपहरणाचा बनाव रचला.
नातीला मुलीच्या घरी सोडण्यास जात असताना रिक्षात आधीपासूनच बसलेल्या महिलेने नातील खेचले व पळ काढला अशी तक्रार बोरसे यांनी केली होती. या प्रकाराची तक्रार येताच पोलिसांनी लागलीच या मुलीच्या शोधासाठी पाच पथके रवाना केली. मात्र, तपासादरम्यान या मुलीचा मृतदेह कात्रप परिसरात एका नाल्यात सापडला होता. या प्रकरमी पुढील तपास सुरू असताना आज्जीनेच नातीची हत्या केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले.