पॅरोलसाठी ‘आजोबा’ही जवळचे नातेवाईक
By Admin | Updated: November 25, 2014 01:37 IST2014-11-25T01:37:22+5:302014-11-25T01:37:22+5:30
मुंबई (पॅरोल अॅण्ड फरलो) नियम-1959मधील नियम 19मध्ये उल्लेख नसला तरी आजोबांचाही जवळच्या नातेवाइकांत समावेश होत असल्याचा खुलासा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केला आहे.

पॅरोलसाठी ‘आजोबा’ही जवळचे नातेवाईक
नागपूर : मुंबई (पॅरोल अॅण्ड फरलो) नियम-1959मधील नियम 19मध्ये उल्लेख नसला तरी आजोबांचाही जवळच्या नातेवाइकांत समावेश होत असल्याचा खुलासा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केला आहे.
संबंधित नियमांत केलेली व्याख्या र्सवकष नसून उदाहरणात्मक असल्याचे तसेच जवळच्या नातेवाइकांमध्ये उल्लेखीत नात्यांना र्निबधात्मक अर्थाने पाहता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाने ‘मोहम्मद वसीम वि. महाराष्ट्र शासन’ प्रकरणावरील निर्णयात आजी जवळची नातेवाईक असल्याचे नमूद केले होते.
नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेप भोगत असलेला कैदी रमेश दामोदर घागरेच्या आजोबांचे 11 नोव्हेंबर रोजी निधन झाले. यामुळे त्याने पॅरोल मिळण्यासाठी अर्ज केला होता. विभागीय आयुक्तांनी 12 नोव्हेंबर रोजी अर्ज फेटाळून लावला. 23 मार्च 2क्13 रोजी पॅरोलवर सोडले असता घागरेला अटक करावी लागली होती. पॅरोल मुदत संपल्यापासून तो 15क् दिवस फरार होता. तसेच, नियम 19 मध्ये उल्लेखीत नातेवाइकांत ‘आजोबां’चा समावेश नाही अशी दोन कारणो पॅरोल नाकारताना देण्यात आली होती. या निर्णयाला घागरेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. वडील 3क् वर्षापासून बेपत्ता असल्यामुळे त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी पॅरोलवर सोडण्याची विनंती घागरेने केली होती. यावर निर्णय देताना न्यायालयाने वरील खुलासा करून घागरेला 15 दिवसांचा पॅरोल मंजूर केला. त्यासाठी प्रत्येकी 1क् हजारांचे दोन जामीनदार देण्याची अट ठेवली. जामीनदार याचिकाकत्र्याच्या जवळचे नातेवाईक असावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
काय म्हणतो नियम 19
वडील, आई, भाऊ, बहीण, पत्नी, मुले गंभीर आजारी असतील किंवा त्यांचा मृत्यू झाला असेल, भाऊ, बहीण व मुलांचे लग्न असेल, महिला कैद्याचे बाळंतपण असेल, घर कोसळणो, पूर, आग व भूकंप अशी नैसर्गिक आपत्ती ओढवली असेल अशा परिस्थितीत संबंधित कैद्याला एकावेळी 3क् दिवसांच्या पॅरोलवर सोडता येईल.