शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 17:26 IST

राज्य एसटी महामंडळाच्या सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिवाळीपूर्वी भेट दिली आहे.

मुंबई  - राज्य एसटी महामंडळाच्या सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिवाळीपूर्वी भेट दिली आहे.  एस.टी. महामंडळात कार्यरत असणाऱ्या सुमारे 1 लाख 10 हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे  2,500 आणि 5,000 रुपये इतकी रक्कम भेट म्हणून देण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. गेली 4 वर्षे एस.टी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येते. यापूर्वी राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 10,000 रुपये अग्रिम देण्यात आले आहेत. आता  सुमारे 1 लाख 10 हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे 2,500 रुपये आणि 5,000 रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे सध्या राज्यात आचारसंहिता सुरू असल्याने याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.  निवडणूक आयोगाची परवानगी मिळताच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येईल, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.  यासंदर्भात एस.टी.च्या अमळनेर (जळगांव) आगाराचे वाहक मनोहर पाटील यांनी दिवाकर रावते यांना यांना दूरध्वनी करुन मागील चार वर्षांप्रमाणे यंदाही सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याविषयी विनंती  केली होती. त्या विनंतीच्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याच्या दृष्टीने दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, केंद्र व राज्यशासनाप्रमाणे देय असलेला 3 टक्के महागाई भत्ता 1 जानेवारी 2019 पासून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यापैकी ऑक्टोबरच्या वेतनामध्ये सदर 3 टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2019 पर्यंतचा थकित महागाई भत्ता देण्याबाबतचा निर्णय यथावकाश घेण्यात येईल.   

टॅग्स :state transportएसटीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDiwakar Raoteदिवाकर रावतेDiwaliदिवाळी