शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदराव आदिक अनंतात विलीन

By admin | Updated: June 8, 2015 01:31 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक (७६) रविवारी अनंतात विलीन झाले.

श्रीरामपूर (जि़अहमदनगर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक (७६) रविवारी अनंतात विलीन झाले. मुंबईतील खासगी रूग्णालयात शनिवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले होते़ श्रीरामपूरमध्ये रविवारी सायंकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी हवेत तीन फैरी झाडून मानवंदना दिली.रविवारी भल्या पहाटे त्यांचे पार्थिव श्रीरामपूर येथे आणण्यात आले. ते राहत असलेल्या हरेगाव बंगल्यात सकाळपासून राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळलेले त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. माजी मंत्री छगन भुजबळ व पारनेरचे आमदार विजय औटी यांनी अंत्यदर्शन घेतले. याठिकाणी पोलिसांनी ‘संगीन शस्त्र’ करून मानवंदना दिली. आझाद मैदानातून पार्थिव बॅरिस्टर रामराव आदिक पब्लिक स्कूलच्या प्रांगणात आणल्यानंतर तेथे अहमदनगर, नाशिक, औरंगाबादसह राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या त्यांच्या समर्थकांनी अंत्यदर्शन घेतले. सजविलेल्या चौथऱ्यावर आदिक यांच्या पार्थिवावर त्यांचे चिरंजीव अविनाश यांनी अंत्यसंस्कार केले. याप्रसंगी पत्नी पुष्पलता उर्फ नानी, सून अनुपमा, कन्या सुजाता, अनुराधा, अंजली, जावई, नातवांसह जनसागर लोटला होता. (प्रतिनिधी) दिलदार माणूस!गोविंदराव हे माझे चांगले मित्र होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याशी आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. राज्यसभेत आम्ही एकत्र असताना साहित्य, कला, संस्कृती अशा राजकारणापलिकडील विषयांवर आमची नेहमी चर्चा होत असे. एक कलासक्त आणि उमद्या मनाचा राजकारणी आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. -विजय दर्डा, राज्यसभा सदस्य आणि लोकमत मीडियाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन