जखमी गोविंदा राजेंद्र बैकर यांचा मृत्यू

By Admin | Updated: November 5, 2014 04:38 IST2014-11-05T04:38:02+5:302014-11-05T04:38:02+5:30

दहीहंडीचा सराव करताना ३ आॅगस्ट रोजी जखमी झालेला गोविंदा राजेंद्र बैकर याचा शनिवारी केईएम रुग्णालयामध्ये मृत्यू झाला

Govinda injured Rajendra Becker's death | जखमी गोविंदा राजेंद्र बैकर यांचा मृत्यू

जखमी गोविंदा राजेंद्र बैकर यांचा मृत्यू

मुंबई : दहीहंडीचा सराव करताना ३ आॅगस्ट रोजी जखमी झालेला गोविंदा राजेंद्र बैकर याचा शनिवारी केईएम रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. दहीहंडीचा सराव करताना बैकर यांच्या मणक्याला जबर मार बसल्यामुळे त्यांना अर्धांगवायू झाला होता. २० दिवसांपूर्वी त्यांना न्यूमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल केले होते.
बैकर हे करी रोड येथील रामदूत इमारतीमध्ये राहत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. करी रोड येथील श्री छत्रपती शिवाजी व्यायाम मंडळातर्फे ते गेली २० ते २२ वर्षे दहीहंडी उत्सवात सहभागी होत होते. बैकर दहीहंडी फोडण्यासाठी दुसऱ्या अथवा तिसऱ्या थरावर चढायचे. ३ आॅगस्ट रोजी सरावादरम्यान बैकर दुसऱ्या थरावर चढले होते. तिसऱ्या थरावर चढलेल्या मुलाचा जोर त्याच्या मानेवर पडल्यामुळे त्यांच्या मणक्याला मार बसला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Govinda injured Rajendra Becker's death