बंधाऱ्यात बुडून गोविंदाचा मृत्यू

By Admin | Updated: August 26, 2016 04:46 IST2016-08-26T04:46:05+5:302016-08-26T04:46:05+5:30

पोहण्यासाठी बंधाऱ्यात उडी मारलेल्या १४ वर्षांच्या मुलाचा बंधाऱ्यातील गाळात रुतून मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील कोळोसे येथे घडली.

Govinda dies in dowry | बंधाऱ्यात बुडून गोविंदाचा मृत्यू

बंधाऱ्यात बुडून गोविंदाचा मृत्यू


महाड : पोहण्यासाठी बंधाऱ्यात उडी मारलेल्या १४ वर्षांच्या मुलाचा बंधाऱ्यातील गाळात रुतून मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील कोळोसे येथे घडली.
अक्षय राजेश पाटील असे या मुलाचे नाव आहे. गुरुवारी गोविंदा खेळल्यानंतर तो आपल्या मित्रासह गावानजीक असलेल्या सिमेंट बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेला होता. त्याने काठावरून बंधाऱ्याच्या पाण्यात उडी मारली. मात्र बराच वेळ तो वर न आल्याने मित्रांनी पात्रात त्याचा शोध घेतला असता पात्रातील गाळात रु तून तो मरण पावला असल्याचे त्यांना आढळून आले. महाड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. (वार्ताहर)

Web Title: Govinda dies in dowry