शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अनुशेष निर्मूलनावरून राज्यपालांनी काढली सरकारची खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 04:33 IST

विशेष प्रतिनिधीमुंबई : विशेषत: सिंचनाचा अनुशेष दूर करण्याबाबत राज्य शासनाच्या उदासीनतेवरून राज्यपाल विद्यासागर राव यांनी शासनाची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. सिंचनासह अन्य क्षेत्रांसाठी निधी वाटपाबाबतचे राज्यपालांचे निर्देश शुक्रवारी जारी करण्यात आले.राज्यातील विविध भागांचा अनुशेष दूर करण्यासाठी अर्थसंकल्पातील तरतुदीचे विभागनिहाय वाटप करण्याचे अधिकार राज्यपालांना घटनेने दिलेले आहेत. त्यानुसार, त्यांनी निर्देश दिले. ...

विशेष प्रतिनिधीमुंबई : विशेषत: सिंचनाचा अनुशेष दूर करण्याबाबत राज्य शासनाच्या उदासीनतेवरून राज्यपाल विद्यासागर राव यांनी शासनाची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. सिंचनासह अन्य क्षेत्रांसाठी निधी वाटपाबाबतचे राज्यपालांचे निर्देश शुक्रवारी जारी करण्यात आले.राज्यातील विविध भागांचा अनुशेष दूर करण्यासाठी अर्थसंकल्पातील तरतुदीचे विभागनिहाय वाटप करण्याचे अधिकार राज्यपालांना घटनेने दिलेले आहेत. त्यानुसार, त्यांनी निर्देश दिले. अविभाजित सिंचनाची तरतूद (संपूर्ण राज्याकरताचा खर्च) ७९० कोटी रुपये असेल. विदर्भाला गोसेखुर्द प्रकल्पासाठी ७०० कोटी रुपये वाटपाव्यतिरिक्त मिळतील. तसेच, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गतही विदर्भाला ५०० कोटी रुपये वेगळे मिळतील. कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेंतर्गत उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी ३०० कोटी रुपये मराठवाड्याला वेगळे मिळणार आहेत.विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम आणि अमरावती या चार जिल्ह्यांतील सिंचनाचा ७६३५७ हेक्टर इतका अनुशेष दूर करण्याचे २०१७-१८ साठीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते.तथापि, त्यातील केवळ ६६९९ हेक्टर इतकाच अनुशेष दूर होऊ शकला. २०१०-११ ते २०१४-१५ साठी अनुशेष निर्मूलनाची विशेष योजना या चार जिल्ह्यांसाठी आखण्यात आली होती. मात्र, अनुशेष दूर होऊ शकला नाही.अनुशेष निर्मूलन कार्यक्रमांतर्गत वर्षनिहाय उद्दिष्टे आणि त्यासाठीची कृती योजना दोन महिन्यांत आपल्याकडे सादर करा, असेआदेश राज्यपालांनी दिलेआहेत.

 

सिंचनासाठीचे वाटप (आकडे कोटी रु.)विदर्भ १४९३.६३मराठवाडा १४४९.२४उर्वरित महाराष्ट्र २९४९.८१अविभाजित सिंचनाची तरतूद (संपूर्ण राज्याकरताचा खर्च) ७९० कोटी रुपये असेल. विदर्भाला गोसेखुर्द प्रकल्पासाठी ७०० कोटी वाटपाव्यतिरिक्त मिळतील.'अन्य क्षेत्रांसाठीचे वाटप (आकडे कोटी रु.)क्षेत्र विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्रऔद्योगिक प्रशिक्षण संस्था ४ ० ४.७५तंत्रनिकेतन ७.०४ ४.९५ २४.८२तंत्र माध्यमिक शाळा २ ० १.९५सार्वजनिक आरोग्य ९.०५ २४.०५ ७५.२८पंपसंचांचे विद्युतीकरण ० ० ५०

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार