शासनाच्या कर्जमाफीचा लाभ ‘यांना’ही
By Admin | Updated: July 8, 2017 22:54 IST2017-07-08T22:54:00+5:302017-07-08T22:54:00+5:30
राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफीचा राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांना होणार असून, दीड लाखांपेक्षा जास्त कर्ज असणारे शेतकरी कर्जाची उर्वरित रक्कम भरून

शासनाच्या कर्जमाफीचा लाभ ‘यांना’ही
- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफीचा राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांना होणार असून, दीड लाखांपेक्षा जास्त कर्ज असणारे शेतकरी कर्जाची उर्वरित रक्कम भरून शासनाच्या कर्जमाफीचा लाभ घेतील. त्यामुळे केवळ दीड लाखाच्या आतील नाही, तर त्यापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार आहे. शासन स्तरावरून लवकरच कर्जमाफीबाबत अधिक सुस्पष्टता येईल तसेच सरसकट कर्जमाफी देणे योग्य नसल्याचे राज्याचे प्रभारी सहकार आयुक्त व पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी स्पष्ट केले.