शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’चे तीन वर्षांचे व्याज सरकार देणार; तिजोरीवर ६ हजार ३३९ कोटींचा भार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 00:13 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजापोटीचे ६ हजार ३३९ कोटी रुपये राज्य शासन आपल्या तिजोरीतून देणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजापोटीचे ६ हजार ३३९ कोटी रुपये राज्य शासन आपल्या तिजोरीतून देणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.विविध बँकांकडून या महामार्गासाठी कर्ज घेण्यात येणार आहे. हे कर्ज राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) घेणार असले तरी टोलची प्रत्यक्ष वसुली सुरू होईपर्यंतच्या तीन वर्षांच्या काळात आम्हाला वित्तीय संस्थांच्या कर्जावरील व्याज देता येणार नाही, अशी भूमिका एमएसआरडीसीने घेतली होती. त्यामुळे पेच निर्माण झाला होता.पहिल्या तीन वर्षांतील व्याजाची रक्कम राज्य शासनाने वित्तीय संस्थांना द्यावी, असा प्रस्ताव एमएसआरडीसीने दिला होता. त्यात पहिल्या वर्षी ५०० कोटी रुपये, दुसºया वर्षी अंदाजे २ हजार कोटी रुपये तर उर्वरित रक्कम तिसºया वर्षी देणे अपेक्षित होते. एमएसआरडीसीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या तीन वर्षांतील मुद्दल आणि त्यानंतरची मुद्दल व व्याजाची रक्कम समृद्धीवरील टोल वसुलीतून त्यानंतरच्या काळात अदा केली जाणार आहे.वेतन आयोगाच्या फरकासाठी उपसमितीजानेवारी २००६ ते फेब्रुवारी २००९ दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचारी, अधिकाºयांना सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम देण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली. ही रक्कम कशा पद्धतीने (हप्ते करून आदी) द्यावी याचे स्वरुप मंत्रिमंडळ उपसमिती निश्चित करेल.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMaharashtraमहाराष्ट्र