शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

आर्थिक अपयश झाकण्यासाठी सरकारी हिंसाचार - आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 4:45 AM

आर्थिक आघाडीवरील अपयश झाकण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप देशात हिंसा पसरवीत आहेत.

मुंबई : आर्थिक आघाडीवरील अपयश झाकण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप देशात हिंसा पसरवीत आहेत. मंदीचा परिणाम सर्व क्षेत्रात होणार आहे. देश अत्यवस्थ अवस्थेत असून कोणत्याही क्षणी कोमात जाऊ शकतो. त्यावर उपाय करण्याऐवजी सरकार विद्यापीठातील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात गर्क आहे. दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातील हिंसाचार या कटाचाच भाग होता, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केला.आंबेडकर यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर सडकून टीका केली. दारुडा जसा घरातल्या वस्तू विकून गुजराण करतो, तसेच मोदी सरकार सार्वजनिक क्षेत्रातील एक एक कंपनी विकून कारभार हाकत आहे. सरकार मुद्दाम जुनी मनुस्मृतीची व्यवस्था आणण्याच्या हेतूने सर्वसामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या दुबळे बनविण्याचा प्रयत्न करत आहे. उत्पन्न आणि खर्चाचा मेळ घालणे अवघड काम असते. त्यात आजवर केंद्र सरकारने उचललेली पावले हीदेशाला कर्जाच्या सापळ्यात अडकवणारी आहेत. सप्टेंबर २०१९अखेर देशावरील कर्ज ५५७.५ कोटी अमेरिकन डॉलर्स एवढे वाढले होते. कर्जाचे हे ओझे चिंताजनक आहे. आर्थिक संकटाशी सामना करण्याचा उपाय या सरकारकडे नाही, हेच या परिस्थितीतून स्पष्ट झाले आहे. सर्व अपयश उघड होऊ नये म्हणून देशात सरकारला यादवी घडवायची आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला.>शहरी नक्षलवादी संज्ञा भाजपने जन्माला घातलीदेशात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्याला झुगारून उभे राहण्याची वेळ आली आहे. संघ आणि भाजपच्या तत्त्वातच हिंसा आहे. याच मार्गाने या संघटना वाढल्या. शहरी नक्षलवादी संज्ञा संघ-भाजपने जन्माला घातली असून, संघच देशातील सर्वात मोठा आतंकवादी आहे, असेही आंबेडकर म्हणाले. अकोला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचाच असेल असा दावा करतानाच वाशिममध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांना पाठिंबा देणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर