शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणाच्या प्रश्नावर शासन ढिम्मच

By admin | Updated: July 25, 2016 05:18 IST

मेळघाटात एप्रिल ते जून या अवघ्या तीन महिन्यांत तब्बल ९२ बालमृत्यू, २७ उपजतमृत्यू आणि १० मातांचे मृत्यू झाले आहेत. मेळघाटच नव्हे, तर राज्यातील नाशिक, नंदुरबार, यवतमाळ

चेतन ननावरे,  मुंबईमेळघाटात एप्रिल ते जून या अवघ्या तीन महिन्यांत तब्बल ९२ बालमृत्यू, २७ उपजतमृत्यू आणि १० मातांचे मृत्यू झाले आहेत. मेळघाटच नव्हे, तर राज्यातील नाशिक, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूर या आदिवासी भागांतही हीच भीषण परिस्थिती आहे. सरकार बदलले, योजनांची नावे बदलली. मात्र, कुपोषणाचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. कारण शासकीय उदासीनता आणि बालक व मातांना देण्यात येणारा पोषण आहारच अशक्त असल्याचे दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी बाकावर असताना १९९३ साली कुपोषणाविरोधात राजकीय लढाई सुरू करत, उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज ते राज्यात सत्तेवर असून, सर्वोच्च पदावर आहेत. त्यामुळे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात ते या प्रश्नाला न्याय देणार का? याकडे आदिवासी समाजाचे लक्ष लागले आहे.मेळघाटामुळे उघडकीस आलेल्या कुपोषणाच्या प्रश्नावर प्रत्येक सरकार आणि राजकीय पक्षाने सोयीचे राजकारण केल्याचे दिसते. आतापर्यंत असा एकही मुख्यमंत्री नाही, ज्यांनी कुपोषणाच्या प्रश्नावर मेळघाटाला भेट दिलेली नाही. इतकेच नाही, तर आतापर्यंत कुपोषणावर अभ्यास करून डॉ. अभय बंग यांच्यासारख्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यापासून युनिसेफसारख्या संशोधक संस्थांनी शासनाला ११ अहवाल सादर केले आहेत. तरीही शासनाने या ठिकाणी विशेष धोरण आखावे, म्हणून येथील सामाजिक कार्यकर्त्यांना झगडावे लागत आहे. याहून मोठी शासकीय उदासीनता तरी कोणती?कुपोषण निर्मूलनासाठी मेळघाटातील धारणी व चिखलदरा या ठिकाणी शासनातर्फे एकात्मिक बालविकास सेवा योजना राबवण्यात येत आहे. या अंतर्गत ६ महिन्यांपासून ६ वर्षांपर्यंतच्या अत्यंत कमी वजन असलेली मुले आणि गरोदर व स्तनदा मातांसाठी पूरक पोषण आहार दिला जातो. आठवड्यातील सहा दिवस दिल्या जाणाऱ्या या आहारात सकाळचा नाश्ता म्हणून कडधान्यांची उसळ आणि दुपारचा आहार म्हणून पौष्टिक खिचडी पुरवली जाते. कडधान्याच्या उसळमध्ये चवळी किंवा मटकी, तेल, हळद आणि मीठ असते. तर पौष्टिक खिचडीमध्ये तांदूळ, मूगडाळ, तेल, हळद, मीठ आणि चवीनुसार पालक भाजीचा समावेश केला जातो. मात्र, यातील धक्कादायक बाब म्हणजे, एका मुलाच्या नाश्त्यासाठी शासनाने २ रुपये ७८ पैशांची आणि आहारासाठी २ रुपये ६३ पैशांची तरतूद केली आहे.या योजनेत अगदी थोडी मुले सामावून घेतलेली आहेत. कारण शासनाने योजनेसाठी पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नाही. गेल्या तीन वर्षांत पावसाने राज्यात दडी मारलेली आहे. त्याचा परिणाम आदिवासी भागात अधिक झालेला आहे. कारण आदिवासी भागातील बहुतांश जमीन ओलिताखाली नसते. अशा परिस्थितीमध्ये कुपोषण निर्मूलनासाठी सरकारने विशेष धोरण आखण्याची गरज होती. याउलट शासनाकडून २०१३ सालापासून आतापर्यंत आदिवासी परिसरात ५.९२ रुपये, ६.५२ रुपये आणि ७.९२ रुपये दराने किशोरी, गर्भवती आणि स्तनदा महिलांना पोषक आहार पुरवला जात आहे. महागाईच्या काळात एवढ्या कमी किमतीत पोषण आहाराची गुणवत्ता कितपत सांभाळली जात असेल, याचा अंदाज बांधता येतो.केद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी तर या प्रश्नावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली होती. मात्र, आता सत्तेवर आल्यानंतर कुपोषण निर्मूलनासाठी विशेष धोरण आखण्याऐवजी सरकारने आहे त्याच निधीत कपात केली आहे. त्यामुळे कुपोषणाच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या डॉ. अभय बंग, अ‍ॅड. बी. एस. साने (बंड्या साने), डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे कामच सरकार करताना दिसत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्षाला या प्रश्नाबाबत अधिक माहिती आहे. कारण १९९३ साली कुपोषणाच्या प्रश्नावर विरोधक म्हणून फडणवीस यांनीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे, युतीचे सरकार आल्यावर त्यांनी याचिका मागे घेतली. मात्र, सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पुन्हा भाजपाने दोन वेळा याचिका दाखल केलेली आहे. सरकारने कुपोषण निर्मूलनाचे महत्त्वाचे काम करणाऱ्या आयसीडीएसच्या निधीत या वर्षी ६२ टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. एकंदरीतच कुपोषणाच्या विळख्यात अडकलेल्या बालक आणि महिलांना सुदृढ करायचे असेल, तर शासनाने ठोस उपाययोजना करायची आवश्यक आहे.