विजयकुमार गावीत यांच्या चौकशीसाठी सरकारची परवानगी

By Admin | Updated: July 1, 2014 01:22 IST2014-07-01T01:22:02+5:302014-07-01T01:22:02+5:30

विजयकुमार गावीत यांची बेहिशेबी मालमत्ता असल्याच्या आरोपाची उघडपणो चौकशी करण्यास राज्य शासनाने एसीबीला परवानगी दिल्याचे सोमवारी उच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आल़े

Government permission for the investigation of Vijaykumar Gavit | विजयकुमार गावीत यांच्या चौकशीसाठी सरकारची परवानगी

विजयकुमार गावीत यांच्या चौकशीसाठी सरकारची परवानगी

>मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हक्कालपट्टी झालेले व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ़ विजयकुमार गावीत यांची बेहिशेबी मालमत्ता असल्याच्या आरोपाची उघडपणो चौकशी करण्यास राज्य शासनाने एसीबीला परवानगी  दिल्याचे सोमवारी उच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आल़े
न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठासमोर ही माहिती देण्यात आली़ तसेच ही चौकशी नंदुरबारऐवजी नाशिक  येथील एसीबी अधिकारी करेल, असेही न्यायालयाला सांगण्यात आल़े याचिकाकत्र्याचे वकील उदय प्रकाश वारूंजीकर यांनी आक्षेप घेतला़ ते म्हणाले, हे प्रकरण गेली दोन वर्षे प्रलंबित आह़े तेव्हा याची चौकशी मुंबईतीलच अधिका:याने करावी़
अॅड़ वारूंजीकर यांच्या या युक्तिवादाचे सरकारी वकील समीर पाटील यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही़ त्यामुळे न्यायालयाने या सर्व प्रकरणाची कागदपत्रे व ही चौकशी करण्या:या अधिका:याचे नाव सादर करण्याचे आदेश शासनाला दिल़े नाशिक येथील आदिवासी भागातील विष्णू मुसळे व अन्य तिघा जणांनी जनहित याचिका दाखल केली आह़े त्यानुसार डॉ़ गावित हे आमदार होण्याआधी शिक्षक होत़े तसेच त्यांचा भाऊ शरद गावित हा चतरुथ श्रेणी कामगार होता़ त्यावेळी त्यांचे उत्पन्न हजारोंमध्ये होत़े मात्र आता त्यांचे उत्पन्न कोटी रूपयांच्या घरात गेले आह़े त्यामुळे याची चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत केली आह़े याचे प्रत्युत्तर सादर करताना गावित यांच्यावरील आरोपात तथ्य असून हे गुप्तपणो केलेल्या चौकशीत उघड झाले असल्याचा खुलासा एसीबीने न्यायालयात केला़ 
 
गावित यांच्यावरील आरोपात तथ्य असून हे गुप्तपणो केलेल्या चौकशीत उघड झाले असल्याचा धक्कादायक खुलासा एसीबीने न्यायालयात केला़ तसेच याची चौकशी करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितल्याचे सांगितले.

Web Title: Government permission for the investigation of Vijaykumar Gavit