शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकरी - दिवाकर रावते

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 21:01 IST

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आता सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज जाहीर केला आहे.

मुंबई, दि. 13 - आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आता सरकारी नोकरी देण्याचा निर्णय  राज्य सरकारनं जाहीर केला आहे.  प्राधान्यानं सरकार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलांना नोकरी देणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला आता सरकारी नोकरीचा लाभ मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेने ही मागणी केली होती. ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्याने क वर्गात सरकारी नोकरी देण्यात येईल, परिवहनच नाही सर्व विभागात त्यांना संधी दिली जाणार असल्याची घोषणा दिवाकर रावते यांनी केली. 

फायनन्शियल सेंटर बीकेसीतच होणार : दिवाकर रावतेपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातची शान वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील इंटरनॅशनल फायनान्स सर्विस सेंटरचा बळी जाणार असल्याचं दिसत आहे. मुंबईतील बीकेसीत हे सेंटर होणार आहे. पण मोदींच्या बुलेट ट्रेनच्या स्टेशनसाठी बीकेसीतील 0.9 हेक्टर जागा द्यावी लागणार आहे. मात्र बुलेट ट्रेन आली तरी फायनन्शियल सेंटर होणारच, असं दिवाकर रावते यांनी यावेळी सांगितले. 

बीकेसीतच हे फायनन्शियल सेंटर होईल, त्यासाठी जेवढी जागा बुलेट ट्रेनसाठी द्यावी लागेल, त्याचे पैसे घेतले जातील. त्या पैशातून फायनन्शियल सेंटरची इमारत बांधली जाईल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारGovernmentसरकारFarmerशेतकरी