शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय दस्तऐवजातही पाथरीच साईबाबांची जन्मभूमी असल्याची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 07:42 IST

पाथरी येथील श्री साई जन्मभूमी विकास कृती समितीचे अध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी काही शासकीय दस्ताऐवज जाहीर केले आहेत.

- विठ्ठल भिसेपाथरी (जि़ परभणी) : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबा यांची जन्मभूमी पाथरीच असल्याचे २९ पुरावे समोर आल्यानंतर आता १९६७ मधील परभणी जिल्ह्याचे राज्य शासनाचे  इंग्रजी गॅझेट व पाथरी नगरपालिकेच्या मालमत्ता नोंदणी वहीतही श्री सार्इंची जन्मभूमी पाथरीच असल्याचे दस्तावेज समोर आले आहेत़पाथरी येथील श्री साई जन्मभूमी विकास कृती समितीचे अध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी काही शासकीय दस्ताऐवज जाहीर केले आहेत़ त्यानुसार १९६७ मध्ये राज्य शासनाने परभणी जिल्ह्याचे पहिलेच इंग्रजीमध्ये गॅझेट प्रसिद्ध केले़ या गॅझेटमध्ये देखील श्री साईबाबा यांचे जन्मस्थळ पाथरी असल्याची नोंद आहे़ त्यामध्ये श्री साई बाबा यांचा जन्म पाथरीतील भुसारी कुटुंबात झाला असून, ते पाथरीतून सेलूला गेले़ तेथे त्यांनी सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांना आपले गुरु मानले़ सेलूत केशवराज बाबासाहेब महाराज यांचे मंदिर असून, त्यांचा काळ १७१५ ते १८०९ असा आहे, अशी गॅझेटमध्ये नोंद आहे. याशिवाय शिर्डी येथील संस्थानचे एकेकाळचे विश्वस्त विश्वास खेर यांनी १९७५ मध्ये श्री सार्इंचा पाथरी येथे जन्म झाल्याचे संशोधन केले़ त्यानंतर पाथरी नगरपालिकेने १९७७-७८ ते १९८०-८१ मध्ये श्री साई बाबा यांचे वंशज अण्णासाहेब भुसारी यांच्या नावे असलेल्या घराचे श्री साई स्मारक समिती असे जावक क्रमांक ११५१/८०दि़२२ जानेवारी १९८० अन्वये नामांतर केले असल्याची नोंद आहे़ त्यावेळेसपासून ही नोंद कायम आहे़ नगरपालिकेच्या कागदपत्रांमध्येही पाथरीच श्री सार्इंचे जन्मस्थळ असल्याचा आणखी एक पुरावा समोर आला आहे़ त्यामुळे पाथरीकरांच्या दाव्याला बळ मिळाले आहे़शिर्डीकरांनी मोठेपणा दाखवावा - दुर्राणीपाथरी येथील श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळास शिर्डी येथील विश्वस्त व नागरिकांनी केलेल्या विरोधाचे मूळ हे तेथील अर्थकारणच असल्याचे दुर्राणी यांनी सांगितले़ साई चरणी कोट्यवधी भाविक मनोभावे विविध माध्यमातून देणगी देतात़त्या अनुषंगाने २०१४-१५ ते २०१८-१९ या पाच वर्षांच्या कालावधीत श्री साई संस्थानचे २ हजार ६३५ कोटी २४ लाख रुपयांचे उत्पन्न होते़ त्यामधील १ हजार ६९३ कोटी २० लाख रुपये संस्थानने खर्च केला़ उर्वरित ९४२ कोटी ७ लाख रुपये संस्थानने बँक डिपॉझिट केले़ या अर्थकारणाला फटका बसण्याची भीती शिर्डीकरांना वाटते़ म्हणूनच ते सत्य नाकारून पाथरीला विरोध करीत आहेत, असे दुर्राणी यांनी सांगितले. शिर्डीकरांनी पाथरीला विरोध न करता मोठ्या मनाने या जन्मस्थळाचा विकास होण्यासाठी उदार भूमिका घ्यावी, असेही ते म्हणाले़

टॅग्स :saibabaसाईबाबाSaibaba Mandirसाईबाबा मंदिर