शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सरकार म्हणजे बश्या बैल, यांना रुमण्याचा हिसका दाखवावाच लागेल- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 18:29 IST

शेतकऱ्यांशी आणि शेतीशी या सरकारचा काहीही संबंध नाही. हे सरकार म्हणजे बश्या बैल आहे, यांना वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रुमण्याचा हिसका दाखवावाच लागेल, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी जनतेला केले आहे.

नांदेड - शेतकऱ्यांशी आणि शेतीशी या सरकारचा काहीही संबंध नाही. हे सरकार म्हणजे बश्या बैल आहे, यांना वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रुमण्याचा हिसका दाखवावाच लागेल, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी जनतेला केले आहे. पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनानिमित्ताने आयोजित केलेल्या उमरी येथील सभेला संबोधित करताना ते बोलत होते.अजित पवार यांच्या भाषणाआधी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. मुंडे म्हणाले की, मुख्यमंत्री जरी शेतकरी असल्याचं म्हणत असले तरी ते कोणत्याही बाजूने शेतकरी दिसत नाहीत. धनंजय मुंडे यांच्या विधानाचा संदर्भ घेत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. या सरकारमधील लोकांना गाय, बैल, रेडकू यातला फरक कळत नाही. यांना शेतीतले काहीच समजत नाही, तेव्हा या सरकारला वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रुमण्याचा म्हणजे चाबकाचा हिसका दाखवावाच लागेल, असं अजित पवार म्हणाले आहेत.या सभेला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री अनिल देशमुख, नांदेड जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर, माजी खा. गंगाधररावजी कुंटुरकर, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी महिला काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस सोनाली देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर आणि पक्षाचे इतर प्रमुख नेते उपस्थित होते.गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसनं मराठवाड्यात हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी नांदेडमधील उमरी येथील सभेसाठी अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी फडणवीस सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. अजित पवार म्हणाले, शेतीसाठीच्या पाणीपट्टीत वाढ भरमसाट वाढ करण्यात आली आहे, सरकारनं दिलेली कर्जमाफीची घोषणाही फसवीच निघाली. शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडण्यासह शेतीला लागणा-या साधन सामग्रीच्या किमतीत वाढ केल्याने शेतक-यांना जीव नकोसा झाला आहे. त्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचं म्हणत फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

टॅग्स :NandedनांदेडAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस