गोरेगाव जुन्या बाजारपेठेत भीषण आग

By Admin | Updated: March 9, 2017 10:02 IST2017-03-09T10:01:19+5:302017-03-09T10:02:26+5:30

गोरेगावमधील मधील जुन्या बाजारपेठेत आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून २ घरे व २ दुकाने जळून खाक झाली.

Goregaon old market in the fierce fire | गोरेगाव जुन्या बाजारपेठेत भीषण आग

गोरेगाव जुन्या बाजारपेठेत भीषण आग

>ऑनलाइन लोकमत
माणगांव, दि. ९  - गोरेगावमधील मधील जुन्या बाजारपेठेत आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये दोन घरांसह तळमजल्यावरील फर्निचरची २ दुकाने जळून भस्मसात झाली असून २५ लाखाची वित्तहानी झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.  
महाडसह जिल्ह्यातील 10 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तास अथक प्रयत्न करून  आगीवर नियंत्रण मिळवले. 

Web Title: Goregaon old market in the fierce fire