शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांना कशासाठी पक्षात घेतलं; मुख्यमंत्री म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 19:33 IST

कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश

मुंबई: सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत भाष्य केलं. दुसऱ्या पक्षात अनेक चांगली माणसं आहेत. त्यांच्यातील निवडक मंडळी घ्यावी लागतात. त्यामध्ये त्रागा करण्याचं काहीच कारण नाही, असं मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं.काँग्रेस, राष्ट्रवादीतून अनेक मंडळी भाजपात येत असल्यानं पक्षातील निष्ठावानांवर अन्याय होत असल्याची चर्चा जोरात सुरू होती. या मुद्द्याला स्पर्श करत मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना विचलित न होण्याचा सल्ला दिला. 'भाजपा प्रायव्हेट लिमिटेड पार्टी नाही, तर ती पब्लिक अनलिमिटेड पार्टी आहे. भाजपाचं राजकारण पाहून विरोधी पक्षातील अनेक चांगल्या लोकांना पक्षात यायचं आहे. त्यांच्यातील निवडक मंडळी घ्यावी लागतात. त्यामध्ये त्रागा करण्याचं कारण नाही', असं मुख्यमंत्री म्हणाले. निवडणुकीवेळी भाजपात उड्या मारणाऱ्या नेत्यांना तिकीटं दिली जातात, अशी टीका अनेकदा होते. मात्र यामध्ये तथ्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 'विरोधी पक्षातील चांगली माणसं पक्षात येतात. मात्र गेल्या निवडणुकीत ८५ टक्के तिकीटं पक्षातील लोकांनाच मिळाली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अजिबात विचलित न होता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावं' अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी त्यांनी विरोधकांना टोलादेखील लगावला. विरोधकांचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई अध्यक्ष पराभूत झालेत. राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी तर निवडणूकच लढवली नाही. वंचितचे अध्यक्ष निवडणुकीत पराभूत झाले, अशी कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी लगावली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस