शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसाठी खुशखबर... राज्यात १ लाख घरे बांधणार; गृहमंत्री अनिल देशमुखांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 06:41 IST

गृहमंत्री अनिल देशमुख : सुशांतसिंह प्रकरणी सीबीआयकडून अद्याप उत्तर नाही

औरंगाबाद : राज्यातील पोलिसांसाठी १ लाख घरे बांधण्याची योजना असून राज्य सरकारकडून अर्थसाहाय्य न घेता ही योजना राबविली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी ‘लोकमत भवन’ येथे केली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास अहवाल सीबीआयकडे मागितला आहे, परंतु सीबीआयने त्यावर राज्य सरकारला अजूनही उत्तर दिलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.

गृहमंत्री देशमुख यांनी शुक्रवारी ‘लोकमत भवन’ला भेट दिली. यावेळी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले.कोरोना काळात राज्यातील पोलिसांनी जीवाची पर्वा न करता अतुल्य कामगिरी बजावली. यावर गृह विभागाने ‘अतुल्य हिंमत’  हे कॉफी टेबल बुक काढले आहे. त्याची प्रतही त्यांनी राजेंद्र दर्डा यांना भेट दिली.

जगभरात सायबर गुन्हे वाढत आहेत. ५ ट्रिलियन डॉलर एवढा हा व्यवहार आहे. ते रोखण्यासाठी मुंबईत ५ अद्ययावत सायबर गुन्हे पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. पोलीस दलात साडेबारा हजार शिपायांची भरती करायची आहे, आणि त्यापैकी ५,३०० पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहितीही  गृहमंत्री देशमुख यांनी दिली.

अत्यावश्यक सेवेसाठी लवकरच ११२ क्रमांकअत्यावश्यक सेवा म्हणून लवकरच ११२ हा क्रमांक कार्यान्वित होईल. हा क्रमांक डायल करताच आणीबाणीच्या वेळी त्वरित पोलीस तेथे पोहोचतील. यासाठी जीपीएस यंत्रणा सज्ज असलेली दोन हजार चारचाकी, तर अडीच हजार दुचाकी वाहने खरेदी केली जातील. यामुळे राज्यभरात ही अत्यावश्यक सेवा मदतीसाठी पोहोचू शकते.  यामुळे कायदा-सुरक्षा बळकट होईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना प्रादुर्भावात शहीद पोलिसांच्या कुटुंबांना मदतकोरोनाच्या काळात पोलीस दलाने अतिशय महत्त्वपूर्ण काम केले. कायदा व सुव्यवस्थेसोबतच परप्रांतीयांना आपल्या घरी परत पाठविण्यासाठी मदत केली. यात कोरोना प्रादुर्भावात ३३० पोलीस शहीद झाले. त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ६५ लाख रुपयांची मदत सरकारने केली आहे, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

अर्णब चॅट प्रकरणी केंद्र सरकारने खुलासा करावा  बिहारमधील निवडणुकांवर डोळा ठेवून केंद्राने अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला; परंतु सात महिने उलटले तरी तपास लागला नाही. उलट टीआरपी घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांकडून तंत्रशुद्ध पद्धतीने चालू आहे. अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या चॅटमधून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अतिसंवेदनशील माहिती उघड झाली असून ती अर्णबपर्यंत कशी पोहोचली, याचा खुलासा केंद्र सरकारने केला पाहिजे, असेही देशमुख म्हणाले.

टॅग्स :PoliceपोलिसAnil Deshmukhअनिल देशमुखRajendra Dardaराजेंद्र दर्डाLokmatलोकमत