शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज: आगामी ४८ तासांत महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 18:24 IST

पुढील ४८ तासांत गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागात तो आणखी सरकण्याची शक्यता आहे.  

केरळात दाखल झालेला मान्सून राज्यात येण्यास अवधी असला तरी हवामानात होत असलेल्या बदलामुळे महाराष्ट्रात आगामी ४८ तासांत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासांत महाराष्ट्र, गोवा भागामध्ये पावसाचं आगमन होऊ शकतं. नैऋत्य मान्सून आज पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटकातील कारवारपर्यंत पुढे सरकलेय. पुढील ४८ तासांत गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागात तो आणखी सरकण्याची शक्यता आहे.  

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा मान्सूनच्या तीव्रतेवर परिणाम होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग आणि मध्य अरबी समुद्राचा काही भाग, लक्षद्वीप, केरळचा बहुतांश भाग आणि दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन क्षेत्राचा उर्वरित भाग, मन्नारची खाडी, नैऋत्य, मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागरात पुढे सरकला आहे.

अरबी समुद्रात २०२३ या वर्षातील पहिलेच मान्सूनपूर्व वादळ दिवसेंदिवस जोर धरत आहे. समुद्रात निर्माण झालेल्या खोल दबावाचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून ते वेगाने पुढे जात आहे.  येत्या तीन दिवसांत त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. १२ जूनपर्यंत ही प्रणाली अत्यंत तीव्र चक्रीवादळाची ताकद कायम ठेवण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक परिणाम गुजरातच्या किनारपट्टीवरील शहरांमध्ये दिसून येईल. 

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र