Maharashtra Monsoon: व्याकूळ महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! यंदा मान्सून जोरदार बरसणार, स्कायमेटचा पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 02:47 PM2024-04-09T14:47:45+5:302024-04-09T14:48:06+5:30

Maharashtra Monsoon by Skymet: शापित अल निनोच्या एक्झिटला सुरुवात... त्याची जागा ला निना घेणार... मान्सून कधी येणार?...

Good news for drought Maharashtra! Monsoon will rain heavily this year, Skymet rain forecast monsoon for India in 2024 | Maharashtra Monsoon: व्याकूळ महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! यंदा मान्सून जोरदार बरसणार, स्कायमेटचा पावसाचा अंदाज

Maharashtra Monsoon: व्याकूळ महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! यंदा मान्सून जोरदार बरसणार, स्कायमेटचा पावसाचा अंदाज

गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने महाराष्ट्रासह देशातील बराचसा भाग दुष्काळाच्या झळा सोसू लागला आहे. नुकत्याच आलेल्या भारतातील नद्यांच्या परिस्थितीवरील अहवालात महत्वाच्या नद्यांमध्ये ४० टक्केच पाणी राहिल्याचे सांगण्यात आले आहे. तर अनेक नद्या कोरड्याठाक पडल्या आहेत. अशातच महाराष्ट्रातही बराचसा भाग हा पाण्याविना व्याकुळलेला आहे. ऐन मार्चमध्येच दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या राज्याला दिलासा देणारी बातमी आली आहे. 

स्कायमेटने यंदाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दुष्काळासाठी कारणीभूत असलेल्या अल निनोचा प्रभाव ओसरू लागला असून त्याची जागा आता ला निना घेणार आहे. याचा फायदा भारतीय उपखंडाला होणार असून मान्सून वेळेत दाखल होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. परंतु काही काळ अल निनोच्या एक्झिटचा परिणाम मान्सूच्या आगमनावर जाणवणार असल्याचेही म्हटले आहे. ला निनोमुळे देशभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता स्कायमेटचे एमडी जतीन सिंग यांनी व्यक्त केली आहे. 

यंदाच्या पावसाळ्याचा दुसरा टप्पा चांगला जाणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये थोडी वाट पहावी लागू शकते असा अंदाज स्कायमेटचा आहे. असे असले तरी उत्तर, दक्षिण आणि पश्चिमेकडील भागात पुरेसा चांगला पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सूनचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये पुरेसा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जुलै आणि ऑगस्टच्या काळात कमी पावसाचा धोका आहे. ईशान्य भारतात हंगामाच्या पहिल्या टप्प्यात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अल निनो वरून ला निनामध्ये रुपांतरीत होताना हंगामाची सुरुवात विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

किती कोसळणार...
जून ते सप्टेंबर या काळात मान्सून सरासरीच्या १०२ टक्के कोसळण्याचा अंदाज आहे. अल निनोच्या जाण्याच्या प्रभावामुळे मान्सूनचे आगमन काहीसे लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर आयएमडीने उष्णतेच्या लाटांचे दिवस ८ ऐवजी १० केल्याने पुढील काही माहिने उष्णतेच्या झळा तीव्र होण्याची शक्यता आहे. 

Read in English

Web Title: Good news for drought Maharashtra! Monsoon will rain heavily this year, Skymet rain forecast monsoon for India in 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.