‘अच्छे दिन नहीं बुरे दिन आयेंगे’

By Admin | Updated: June 11, 2014 02:25 IST2014-06-11T02:25:10+5:302014-06-11T02:25:10+5:30

अंमलबजावणी केली नाही तर अच्छे दिन नही बुरे दिन आयेंगे, असा घरचा अहेर काँग्रेसचे सदस्य बाबा सिद्दीकी यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेत दिला.

'Good days will not come bad days' | ‘अच्छे दिन नहीं बुरे दिन आयेंगे’

‘अच्छे दिन नहीं बुरे दिन आयेंगे’

>मुंबई : निव्वळ सरकारी बाबूंवर अवलंबून राहू नका. प्रलंबित निणर्यांची तत्काळ अंमलबजावणी केली नाही तर अच्छे दिन नही बुरे दिन आयेंगे, असा घरचा अहेर काँग्रेसचे सदस्य बाबा सिद्दीकी यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेत दिला. 
सरकार घोषणा करते पण त्याची अंमलबजावणी होत नाही, महत्वाच्या निणर्यांच्या फाईल केवळ एकडून तिकडे फिरतात. त्यावर वेळीच निर्णय होत नसल्याने सवर्सामान्य जनता हैराण झाली आहे. केवळ चेहरा स्वच्छ असून उपयोगाचे नाही. तर नकारात्मक भूमिका सोडून एखादा चांगला निर्णय घ्या, लोक तुम्हाला दुवा देतील, असेही सिद्दीकी यांनी सुनावले.
एकूण 14 विभागांच्या  अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर चर्चेला सुरूवात करताना सिद्दिकी यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर  टीका केली. पुढे राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनीही मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.
सिद्दीकी म्हणाले, 4क् हजार कोटी रुपयांचा कर देणा:या मुंबईकरांसाठी घोषणा होतात पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. सन 2क्क्क् र्पयतच्या झोपडय़ांना संरक्षण, स्ट्ररला मान्यता याबाबत नुसत्या घोषणाच झाल्या, पण अंमलबजावणी झाली नाही. अफझलपूरकर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी नाही. सीआरङोडच्या क्षेत्नात येणारी बांधकामे, कोळीवाडा या ठिकाणी असणा:या बांधकामांना चार एफएसआय मिळावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता असताना केवळ सरकारी बाबुंवर अवलंबून राहू नका, तर झटपट निर्णय घ्या. नकारात्मक विचार केला तर लोक नाकारतील, असे सिद्दिकी म्हणाले.   सरकारने दिलेल्या आश्वासनांची अमंलबजावणी करण्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असतील तर मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घ्यावी, असे राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी सुनावले.  

Web Title: 'Good days will not come bad days'