गोंदिया : जादुटोण्याच्या संशयातून मारहाण झाल्याने महिलेची आत्महत्या

By Admin | Updated: July 25, 2016 13:10 IST2016-07-25T13:09:54+5:302016-07-25T13:10:15+5:30

जादूटोण्याच्या संशयातून आदिवास दांपत्याला एका कुटुंबाने माराहणा केल्यानंतर पीडित महिलेने आत्महत्या केली

Gondia: Woman commits suicide due to rumors of witchcraft | गोंदिया : जादुटोण्याच्या संशयातून मारहाण झाल्याने महिलेची आत्महत्या

गोंदिया : जादुटोण्याच्या संशयातून मारहाण झाल्याने महिलेची आत्महत्या

ऑनलाइन लोकमत

गोंदिया, दि. २५ - जादूटोण्याच्या संशयातून आदिवास दांपत्याला एका कुटुंबाने माराहणा केल्यानंतर पीडित महिलेने आत्महत्या केली आहे.  जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजोली या गावी एका आदिवासी दाम्पत्याला गावातील एका कुटुंबाने जबर मारहाण केली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याने आणि मारहाण करणा-यांच्या दहशतीमुळे महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. यामुळे गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान गावक-यांनी पोलिसांच्या भूमिकेवर रोष व्यक्त करीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. 

Web Title: Gondia: Woman commits suicide due to rumors of witchcraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.