गोंदियात हॉटेलच्या आगीत सात जणांचा मृत्यू

By Admin | Updated: December 22, 2016 04:56 IST2016-12-22T04:56:06+5:302016-12-22T04:56:06+5:30

शहराच्या मुख्य बाजारपेठेतील ‘हॉटेल बिंदल’ला बुधवारी पहाटे लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. ही आग तब्बल सात

In Gondia, seven people die in a hotel fire | गोंदियात हॉटेलच्या आगीत सात जणांचा मृत्यू

गोंदियात हॉटेलच्या आगीत सात जणांचा मृत्यू

गोंदिया : शहराच्या मुख्य बाजारपेठेतील ‘हॉटेल बिंदल’ला बुधवारी पहाटे लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. ही आग तब्बल सात तासानंतर आटोक्यात आली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्अंदाज आहे. एसीमुळे आग आणखी भडकली. आगीत शेजारीच्या नर्मदा आर्ट गॅलरीतील साहित्यही भस्मसात झाले. हॉटेलच्या ढिगाऱ्यातून सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. आग लागल्यानंतर जीव वाचविण्यास एकने दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली उडी मारली. त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्थानिक आणि अग्निशमन दलाने सात जणांना वाचविले.
सुरेंद्र सोनी (६५), (मध्य प्रदेश), प्रेमनारायण साबू (४०, रा. नागपूर), प्रदीप देशकर (२६, रा. नागपूर), अभिजित पाटील (४० रा. पुणे), आदित्य कुऱ्हाडे (३२, जि. वर्धा) व राजाराम येडे (५५) अशी मृतांची नावे आहेत.

Web Title: In Gondia, seven people die in a hotel fire