दरोडेखोरांनी लुटले ३७ लाखांचे सोने !

By Admin | Updated: December 10, 2015 03:13 IST2015-12-10T03:13:33+5:302015-12-10T03:13:33+5:30

येथील गंजगोलाई परिसरातील सराफ बाजारात सात जणांच्या टोळीने कारागिराच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून ३७ लाखांचे दीड किलो सोने लुटले.

Gold robbers robbed of 37 lakhs! | दरोडेखोरांनी लुटले ३७ लाखांचे सोने !

दरोडेखोरांनी लुटले ३७ लाखांचे सोने !

लातूर : येथील गंजगोलाई परिसरातील सराफ बाजारात सात जणांच्या टोळीने कारागिराच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून ३७ लाखांचे दीड किलो सोने लुटले. पोलिसांनी सात अज्ञात दरोडेखोरंविरुद्ध गुन्हा नोंदविला असून चार तपास पथकांची नियुक्ती केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली.
कोलकाता येथील चंदन शंकर भौमिक हे येथे सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करतात. हल्ल्यादरम्यान एका कारागिराने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्या हातावर एका दरोडेखोराने हातावर कोयत्याने वार केला. त्यानंतर कारागिरांना आत कोंडून दरोडेखोर पळाले. (प्रतिनिधी)

Web Title: Gold robbers robbed of 37 lakhs!