शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

संकेतस्थळ नोंदीवरून जात प्रमाणपत्र द्या! मराठा कुणबी प्रमाणपत्रांबाबत आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 12:57 IST

मराठा कुणबी नोंदींच्या अनुषंगाने जात प्रमाणपत्रांसाठी अर्ज करण्यात येत आहेत. अर्जांनुसार प्रमाणपत्रासाठी नोंदीचा ज्या विभागाचा पुरावा आणला जातो, त्याची प्रमाणित प्रत  आणण्यास सांगितली जाते.  

मुंबई/पुणे : राज्यात ५४ लाख मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मात्र तरीही या आधारावर नागरिकांना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असल्याची दखल न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने घेतली आहे. जात प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या अर्जांच्या कागदपत्रांच्या प्रमाणित प्रतींचा आग्रह न धरता संकेतस्थळावरील नोंदी तपासून जातप्रमाणपत्र द्यावे, असे निर्देश समितीकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 

मराठा कुणबी नोंदींच्या अनुषंगाने जात प्रमाणपत्रांसाठी अर्ज करण्यात येत आहेत. अर्जांनुसार प्रमाणपत्रासाठी नोंदीचा ज्या विभागाचा पुरावा आणला जातो, त्याची प्रमाणित प्रत  आणण्यास सांगितली जाते.  या अडचणीवर मात करण्यासाठी  जिल्हाधिकाऱ्यांनीच नोंदी आढळलेले पुरावे स्कॅन करून संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत. हे पुरावे नागरिकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तलाठ्यांच्या माध्यमातून गावपातळीवर मोहीम राबविण्यात यावी, असे निर्देश समितीकडून देण्यात आले आहेत.

प्रमाणित प्रत मागू नकाजातप्रमाणपत्र देणाऱ्या सक्षम प्राधिकारी (उपविभागीय अधिकारी, महसूल) यांनी  नोंदीच्या अभिलेखाची नव्याने प्रमाणित प्रत मागणे योग्य नाही. त्यामुळे ज्या नागरिकांच्या कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीच्या नोंदी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, त्यांच्या प्रमाणित प्रतीऐवजी नागरिकांनी सादर केलेल्या नोंदीच्या पुराव्यांची खातरजमा संबंधित यंत्रणेने संबंधित विभागाच्या संकेतस्थळाच्या आधारे करावी. जो अभिलेख संकेतस्थळावर अस्पष्ट आहे, त्याची सुस्पष्ट वाचनीय प्रत अपलोड करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

नोंदीच्या पुराव्याची खातरजमा संबंधित यंत्रणेने करावी, असेही म्हटले आहे. जो अभिलेख संकेतस्थळावर अस्पष्ट आहे त्याची सुस्पष्ट वाचता येईल, अशी प्रत अपलोड करावी; तसेच अन्य भाषा लिपीतील अभिलेख देवनागरीत करून तो अपलोड करावा.- सुमंत भांगे, सचिव, सामाजिक न्याय विभाग 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkunbiकुणबीreservationआरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीState Governmentराज्य सरकार