‘...तर महाराष्ट्र खड्ड्यात जाणार’

By Admin | Updated: December 23, 2016 05:02 IST2016-12-23T05:02:59+5:302016-12-23T05:02:59+5:30

शाहू, फुले, आंबेडकर यांच्या मार्गाने महाराष्ट्र गेला नाहीतर महाराष्ट्र खड्ड्यात जाणार असे परखड मत माजी खासदार भालचंद्र

'... go to Maharashtra pit' | ‘...तर महाराष्ट्र खड्ड्यात जाणार’

‘...तर महाराष्ट्र खड्ड्यात जाणार’

मुंबई : शाहू, फुले, आंबेडकर यांच्या मार्गाने महाराष्ट्र गेला नाहीतर महाराष्ट्र खड्ड्यात जाणार असे परखड मत माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आल्यापासून दलित अत्याचारांत वाढ झाल्याचा आरोपही त्यांनी केला. संविधान सन्मान महामोर्चा २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच होणार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. संविधान गौरव महामोर्चाविषयी सोशल मिडीयावर व माध्यमांमध्ये होणाऱ्या चर्चेला छेद देत संविधान सन्मान महामोर्चा नियोजित वेळेप्रमाणे होणार असल्याचे मुणगेकर यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: '... go to Maharashtra pit'