शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

गोवा- मुंबई प्रवास होणार सहा तासांत

By admin | Updated: September 22, 2016 18:58 IST

गोव्यात रस्ते, महामार्ग, पुल, बंदरे, नद्या उसपणो, जलमार्गाचा विकास अशा अनेक प्रकल्पांसाठी एकूण वीस हजार कोटींचा निधी केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज जाहीर केला आहे.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. २२ : गोव्यात रस्ते, महामार्ग, पुल, बंदरे, नद्या उसपणो, जलमार्गाचा विकास अशा अनेक प्रकल्पांसाठी एकूण वीस हजार कोटींचा निधी केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी येथे जाहीर केला. येत्या दोन वर्षात हा निधी खर्च केला जाईल. तसेच गोवा-मुंबई महामार्गाचे काँक्रिटीकरण व चौपदरीकरण केले जाणार असून त्यामुळे गोमंतकीय सहा तासांत मुंबईस पोहचू शकतील, असे गडकरी म्हणाले.

मुरगाव पोर्ट ट्रस्ट (एमपीटी) आणि गोवा सी-पोर्ट प्रा. लिमिटेड यांच्यात गुरुवारी करारावर सही झाली. एमपीटीच्या आठ व नऊ क्रमांकाच्या धक्क्याच्या फेरविकासासाठी हा करार आहे. 1 हजार 145.36 कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पावर येणार आहे. एमपीटीसाठी 2क्क् केव्ही क्षमतेच्या सौरउज्रेचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. हा सोहळा मिरामार येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, वीज मंत्री मिलिंद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर, एमपीटीचे चेअरमन आय.जे. कुमार, सी-पोर्ट कंपनीचे संचालक अशोक कुमार, मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव आदी व्यासपीठावर होते.

गोव्यात महामार्गाचे रुंदीकरण केले जात आहे. मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळापासून आठ किलोमीटरचा नवा महामार्ग बांधला जाईल. गोव्यात नवे बंदर उभे केले जाईल. मांडवी व जुवारी या दोन नद्या 31 ठिकाणी उसपल्या जातील. जलमार्ग यामुळे विकसित होतील व त्याचा लाभ गोव्याला होईल. एमपीटीने समुद्र उसपून बंदराची खोली 14 मीटरवरून 19 मीटरपेक्षा जास्त करण्याचे ठरविले आहे, असे गडकरी यांनी सांगितले. एकूण वीस हजार कोटी रुपये आम्ही गोव्यासाठी खर्च करू. काही कामांसाठी गोवा सरकारकडून आम्हाला अजुन परवानगीची गरज आहे, असेही ते म्हणाले. गोव्याची वाहतूक हरित पद्धतीने व्हायला हवी. त्यासाठी सीएनजीचा वापर वाढावा म्हणून केंद्र सरकार प्रयत्न करील.

गोव्यातील अपघातांच्या जागा सरकारने शोधून काढाव्यात. त्यावर उपाय काढण्यासाठी आम्ही निधी देऊ, असे गडकरी यांनी सांगितले. गोव्यातील बंदरांच्या विकासामुळे मच्छीमारांनी घाबरण्याचे कारण नाही. त्यांनाही अर्थसाह्य करू व त्यामुळे ते 12 सागरी मैलांच्याही पलिकडे जाऊन मासेमारी करू शकतील. वास्को शहर व एमपीटीमध्ये जो वाद आहे, त्यावर योग्य तोडगा काढू. मच्छीमारांचे हित आम्ही जपू. गोव्यात जेटींचा विकास करू, असे गडकरी यांनी जाहीर केले.

मुंबईस पोहचा सहा तासांतगोवा- मुंबई महामार्गाचे चौपदीकरण केले जाणार आहे. पूर्ण काँक्रिटचा हा महामार्ग होईल. त्यामुळे वाहतुकीतील वेळ खूपच कमी होईल व गोमंतकीयांना सहा तासांत मुंबई गाठता येईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. जलमार्ग, बंदरे व किनारपट्टी विकासासाठी देशभर सागरमाला प्रकल्प राबविला जाणार आहे. एकूण 12 लाख कोटींची गुंतवणूक त्यानिमित्ताने सागरी राज्यांमध्ये होईल. देशात सध्या दिवसाला आम्ही 22 किलोमीटरच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण करत आहोत.

यापुढे 42 किलोमीटर प्रती दिन काम करण्याचे लक्ष्य आहे, असे गडकरी यांनी सांगितले. समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर गोव्यात उभा करण्याचे सूतोवाचही गडकरी यांनी केले. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी गडकरी यांच्या कामाच्या वेगाची स्तुती केली. गडकरी यांच्यामुळे गोव्याला खूप लाभ होत आहे. जुवारी नदीवर नवा पुल यापुढे साकारणार आहे. पुलामुळे बांबोळीपासून वेर्णार्पयत नवे रस्ते अस्तित्वात येतील. पुलापेक्षाही जास्त खर्च या रस्त्यांच्या कामावर केला जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.