जळगाव : नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली असून त्यांना दिलासा देण्यासाठी एक एप्रिलपासून सर्वंकष पीक विमा योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. खडसे व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँँकेत शिखर बँकेचे माजी चेअरमन प्रल्हादराव पाटील यांच्या पुतळ््याचे अनावरण झाले. सर्वंकष पीक विमा योजनेअंतर्गत घटक गावात जर दुष्काळ असेल किंवा नुकसान झाले असेल तर संबंधित तालुक्यातील सर्व गावांना पीक विम्याचा लाभ मिळेल. ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असावी किंवा इतर तांत्रिक अडचणी दूर होतील, अशीही ग्वाही त्यांनी दिली. शेतकरी हा महत्त्वाचा घटक असल्याने त्यांच्यासाठी शाश्वत कर्जप्रणाली आणणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सहकार क्षेत्र टिकेल तरच शेतकरी टिकेल, असेही ते म्हणाले. कापसाला ७७१ कोटी अनुदानकापूस उत्पादकांना मदतीची गरज आहे. आम्हीही कापसाला सहा हजार भाव मिळावा, अशी मागणी केली होती. पण सध्या जागतिक बाजारपेठेतच कापसाला उचल नाही. सरकारने खरेदी केलेल्या कापसासंबंधी क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपये तोटा आजच आला आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सर्वंकष पीक विमा योजना १ एप्रिलपासून
By admin | Updated: March 15, 2015 01:13 IST