शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

एका हाताने दिले, दुसऱ्याने परत घेतले; बांधकाम व्यावसायिक नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2021 5:26 AM

प्रीमियम सुटीचा लाभ कसा मिळणार? राज्य सरकारने बांधकाम व्यावसायाला चालना आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी गृहप्रकल्पांना सर्व अधिमूल्यावर (प्रीमियम) ५० टक्के सूट जाहीर केली.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : येत्या वर्षभर म्हणजे ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत गृहप्रकल्पांना सर्व अधिमूल्यावर (प्रीमियम) ५० टक्के सूट जाहीर केली, मात्र ही सवलत घेण्याऱ्या प्रकल्पातील घर विक्री करताना, ग्राहकाऐवजी आता मुद्रांक शुल्क बांधकाम व्यावसायिकांनी भरावे असा अजब निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. म्हणजे एका हाताने सवलत देत दुसऱ्या हाताने त्याहून अधिक रक्कम भरण्याचा, आवळा देऊन कोहळा काढणारा हा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया बांधकाम व्यावसायिकांनी दिली आहे.

राज्य सरकारने बांधकाम व्यावसायाला चालना आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी गृहप्रकल्पांना सर्व अधिमूल्यावर (प्रीमियम) ५० टक्के सूट जाहीर केली. मात्र सरकारच्या या निर्णयावर बांधकाम व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यात सरकार, बांधकाम व्यावसायिकांचे नुकसान आहेच, शिवाय याचा फायदा ग्राहकांना कितपत मिळेल याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.

बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक वाढावी, रोजगारनिर्मिती व्हावी, अर्थव्यवस्थेला गती मिळावी आणि जास्तीत जास्त परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत म्हणून दीपक पारेख समितीने केलेल्या शिफारशीनुसार सर्व अधिमूल्यावर ५० टक्के सवलत दिली. मात्र उसासा घेण्याआधीच अशी सवलत घेणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना घर विक्री करतानाचे सर्व मुद्रांक शुल्क भरावयास लावणे म्हणजे मोठा धक्का आहे.

आता अधिमूल्य हे महापालिकेचे मोठे उत्पन्न आहे. या निर्णयाने आधीच आर्थिक समस्यांमुळे विकासकामांना ठेंगा दाखवणाऱ्या महापालिकांच्या उत्पन्नावर पाणी पडणार आहे.

मोठ्या बिल्डरांचे हित जोपासणाराग्राहकांचे हित आणि बांधकाम व्यावसायिकांना लाभ असा दुहेरी फायदा वरवर दाखवणारा हा निर्णय मुंबई सारख्या महानगरातील अत्यंत मोठ्या प्रकल्पांना आणि ते उभारणाऱ्या निवडक बांधकाम व्यावसायिकांचेच हित जोपासणारा आहे. जिथे चालू वार्षिक बाजारमूल्य दर (रेडी रेकनर) अधिक आहे अशा शहरात आणि ते कमी असणाऱ्या शहरात यात फरक पडणारच. छोटे गृहप्रकल्प उभारणाऱ्या राज्यातील बहुतांश बांधकाम व्यावसायिकांना आधीच निधी उभारताना संघर्ष करावा लागतो, तिथे सवलतीचा लाभ कमी आणि मुद्रांक शुल्क मात्र जास्त भरावा लागेल.

शासनाने निर्णयाचा फेरविचार करावाशासनाने तात्कालिक फायदा बघून महाराष्ट्राचे दीर्घकालीन नुकसान केलेले आहे. प्रीमियमचे रेट कमी केल्यामुळे महापालिकेचे नुकसान होईलच सोबत शासनाचेही नुकसान होणार आहे. याबरोबरच प्रीमियमचे रेट कमी झाल्याने टीडीआर घेण्यासाठी कोणी पुढे येणार नाही. टीडीआर विकल्या गेले नाही तर कोणीही आपल्या जमिनी विनाटीडीआर रस्त्यासाठी देणार नाही. लोक भूसंपादनासाठी पैशाची मागणी करतील. अगोदरच सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे लोक जमिनी देणार नाहीत, परिणामी इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणार नाही. यामुळे सगळे नुकसानच नुकसान आहे. त्यामुळे या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा. आणखी तपशीलवार व सूक्ष्म नियोजन करून परवडणारी घरे कशी उपलब्ध होतील, यादृष्टीने शासनाने विचार करावा, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योग