शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

Maharashtra Political Crisis: ठाकरे सरकार परीक्षा द्या! भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट; अधिवेशन घेण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 06:30 IST

फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आदी नेत्यांनी रात्री राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन दिले. 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी  विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मंगळवारी रात्री केली. राज्यपाल आता विशेष अधिवेशन कधी बाेलवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यपालांनी तसे आदेश विधानमंडळ सचिवांना दिले असल्याचे एक पत्र ही भेट सुरू असतानाच सोशल मीडियात व्हायरल झाले. मात्र, हे पत्र खोटे असून तसे कोणतेही आदेश राज्यपालांनी दिलेले नाहीत, असे राजभवनकडून रात्री उशिरा स्पष्ट करण्यात आले.

रात्री उशिरा घडामाेडींना वेग -- फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आदी नेत्यांनी रात्री राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन दिले. - महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या ४९ आमदारांनी सरकारपासून दूर जाण्याची भूमिका घेतली आहे. ९ मंत्र्यांना पदावर कायम ठेवून त्यांची खाती अन्य मंत्र्यांना देण्यात आली आहेत. - सरकारवरील अस्थिरतेचे सावट स्पष्ट दिसत आहे. राज्यासाठी अशी परिस्थिती अजिबात हितावह नाही. राज्यातील सामान्य जनतेच्या मनातही सरकारच्या स्थैर्याविषयी शंकेचे वातावरण आहे.- त्यामुळे नेमकी स्थिती काय आहे हे स्पष्ट होण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावे, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली. 

भाजप आमदार आजपासून मुंबईत -भाजपच्या सर्व आमदारांना पुढील दोन दिवस मुंबईत राहण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. येत्या दोनतीन दिवसात वेगवान राजकीय हालचाली होवू शकतात, त्यामुळे तुम्ही मुंबईतच राहा असे त्यांना सांगण्यात आले आहे.

शिंदे यांच्या सोबत असलेले काही आमदार मुंबईत राज्यपालांची भेट घेत विश्वासदर्शक ठरावाची मागणी करतील असे म्हटले जात होते. 

३९ आमदार बाहेर आहेत, त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकारमध्ये राहायचे नाही. राज्यातील आघाडी सरकार अल्पमतात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या सरकारला व मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करायला सांगा, अशी विनंती आम्ही राज्यपालांना भेटून केली आहे. ते योग्य निर्देश देतील अशी अपेक्षा आहे.     - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी