गटनेत्यापेक्षा ज्येष्ठ नगरसेवकाला संधी द्या

By Admin | Updated: April 30, 2016 00:23 IST2016-04-30T00:23:07+5:302016-04-30T00:23:07+5:30

ज्येष्ठ नगरसेवकाला द्यायला हवी अशी कुजबुज भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षात होत आहे.

Give an opportunity to senior councilors more than group leader | गटनेत्यापेक्षा ज्येष्ठ नगरसेवकाला संधी द्या

गटनेत्यापेक्षा ज्येष्ठ नगरसेवकाला संधी द्या

पुणे : महापालिकेने स्मार्ट सिटीसाठी स्थापन केलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या स्वतंत्र कंपनीच्या संचालकपदी पक्षाच्या गटनेत्यांची निवड न करता ती संधी ज्येष्ठ नगरसेवकाला द्यायला हवी अशी कुजबुज भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षात होत आहे. पदसिद्ध संचालकांच्या पक्षांशिवाय ज्या अन्य दोन राजकीय पक्षांना संधी मिळणार आहे, त्यात भाजपा व मनसे या पक्षांचा समावेश आहे.
कंपनीबाबतच्या केंद्र व राज्य सरकारच्या अध्यादेशामध्ये संचालक मंडळाची रचना दिलेली आहे. त्यात महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता, सभागृहनेते हे पदसिद्ध संचालक असतील, असे नमूद आहे. हे पदसिद्ध संचालक ज्या राजकीय पक्षांचे असतील त्या पक्षांशिवाय ज्या राजकीय पक्षांची सदस्य संख्याबळाच्या उतरत्या क्रमानुसार प्रत्येकी १ सदस्य याप्रमाणे २ संचालक घेण्यात येतील, असे त्यात स्पष्ट करण्यात आले. त्यात कुठेही त्या पक्षांचे गटनेते असे म्हटलेले नाही. त्याचाच आधार घेत या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये कुजबुज सुरू झाली आहे. गणेश बिडकर पालिकेतील भाजपाचे व राजेंद्र वागसकर मनसेचे गटनेते आहेत. पालिकेतील पक्षाच्या कामकाजाच्या सोयीसाठी म्हणून गटनेतेपद निवडण्यात येते. महापौर, आयुक्त यांनी बोलावलेल्या बैठकांना गटनेते उपस्थित असतात.
पक्षासाठी काम करूनही पदांची संधी न मिळालेले काही ज्येष्ठ नगरसेवक दोन्ही पक्षांमध्ये आहेत. स्मार्ट सिटीसाठीची त्यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालय, स्वतंत्र कर्मचारी, स्वतंत्र कार्यक्षेत्र, स्वतंत्र अंदाजपत्रक अशा बऱ्याच गोष्टींची सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळेच संचालक पदाची संधी मिळावी, अशी दोन्ही पक्षांतील ज्येष्ठ नगरसेवकांची भावना आहे.
(प्रतिनिधी)
सर्वसहमतीने निर्णय घेऊ
माझ्यासमोर हा विषय गुरुवारी रात्रीच आला आहे. अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही, मात्र आज रात्री सर्वांबरोबर चर्चा करून नाव निश्चित करू व तसे महापालिकेतील पक्षनेतृत्वाला कळवण्यात येईल.
- योगेश गोगावले,
शहराध्यक्ष-भाजपा
शक्यतो नवा चेहरा असावा असाच आमचा प्रयत्न आहे, मात्र याबाबतचा निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे हेच घेतील. उद्या नाव जाहीर करू.- हेमंत संभूस, अध्यक्ष, मनसे

Web Title: Give an opportunity to senior councilors more than group leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.