इतर आरक्षणाला धक्का न लावता न्याय द्या - छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 01:40 IST2020-09-18T01:39:41+5:302020-09-18T01:40:07+5:30
भुजबळ म्हणाले की, अन्य आरक्षणांना धक्का न लावता या समाजाला आरक्षण दिले पाहिजे. ओबीसींचे २७ टक्के नाही तर १९ टक्के आरक्षण आहे.

इतर आरक्षणाला धक्का न लावता न्याय द्या - छगन भुजबळ
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण देण्यास कोणाचाही विरोध नाही; मात्र दलित, आदिवासी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, अशी सर्वच पक्षांची भूमिका असल्याचे मत ओबीसींचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
भुजबळ म्हणाले की, अन्य आरक्षणांना धक्का न लावता या समाजाला आरक्षण दिले पाहिजे. ओबीसींचे २७ टक्के नाही तर १९ टक्के आरक्षण आहे. त्यात सहा कोटींचा समाज आहे, असे सांगून त्यांनी ओबीसी समाजालादेखील अधिक आरक्षण द्यायला हवे, असे मत व्यक्त केले.