थोडीसी तो लिफ्ट करा दे...

By Admin | Updated: February 26, 2015 05:53 IST2015-02-26T05:53:36+5:302015-02-26T05:53:36+5:30

रेल्वे स्थानकांच्या फलाटांवर असलेल्या जिन्यांमुळे वयोवृद्ध तसेच गरोदर महिलांना समस्यांना तोंड द्यावे लागते. यातून त्यांची सुटका करण्यासाठी सरकते जिने

Give it a little bit ... | थोडीसी तो लिफ्ट करा दे...

थोडीसी तो लिफ्ट करा दे...

मुंबई : रेल्वे स्थानकांच्या फलाटांवर असलेल्या जिन्यांमुळे वयोवृद्ध तसेच गरोदर महिलांना समस्यांना तोंड द्यावे लागते. यातून त्यांची सुटका करण्यासाठी सरकते जिने आणले जात असतानाच सोबतीला लिफ्टही येणार होती. पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर लिफ्ट ऐवजी सरकते जिन्यांनाच प्राधान्य देण्यात आले आणि लिफ्टचा प्रयोग मागे पडत गेला. मुंबई शहर आणि उपनगरीय प्रवाशांसाठी रेल्वेकडून फलाटांवर सरकते जिने बसविले जात आहेत. यात मध्य रेल्वेमार्गावर दादर, घाटकोपर, ठाणे,डोंबिवली, कल्याण स्थानकावर सरकते जिने बसवण्यात आले आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावर दादर, वान्द्रे, विलेपाले, अंधेरी, बोरीवली स्थानकात सरकते जिने बसवण्यात आले. सरकत्या जिन्यांचा आधार प्रवाशांना मिळत असतानाच २0१३-१४ च्या रेल्वे अर्थसंकल्पात माजी रेल्वे मंत्री पवन कुमार बन्सल यांनी देशभरातील रेल्वे स्थानकांवर ए वन-४00 लिफ्टची घोषणा केली.

Web Title: Give it a little bit ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.