शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

इंदु मिलचा निधी वाडिया रुग्णालयाला द्या : प्रकाश आंबेडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 20:42 IST

‘नाईट लाईफ’ हवीच

ठळक मुद्देस्मारकामध्ये स्कुल ऑफ थॉट्स उभारा

पुणे : ‘इंदु मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणे, हे अपेक्षित नाही. त्यामुळे पुतळा व सुशोभिकरणासाठी शासनाने दिलेला सर्व निधी मुंबईतील वाडिया रुग्णालयाला द्यावा,’ अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारण्यालाच विरोध दर्शविला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. आंबेडकर बोलत होते. इंदु मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची साडेतीनशे फुटांपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने मुंबईतील वाडिया रुग्णालयासंदर्भात झालेल्या सुनावणीदरम्यान शासनाला खडे बोल सुनावले.पुतळ्याची उंची वाढविण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत, मात्र आरोग्यसेवेसाठी नाहीत. पुतळे महत्वाचे आहेत की रुग्णालये, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला होता. न्यायालयाची ही भुमिका योग्य असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, इंदु मिलची जागा पुतळ्यासाठी देण्यात आलेली नाही. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ही जागा ‘इंटरनॅशनल स्कुल ऑफ स्टडीज’साठी दिली होती. देशाला आज आंतरराष्ट्रीय राजकारणातील विचार आत्मसात करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने ही जागा बौध्दिक गोष्टींसाठीच वापरायला हवी. याबाबत वायपेयी यांच्याशी चर्चा झाली होती. त्यासाठीच त्यांनी जागा दिली. त्यामुळे या जागेत ‘स्कुल फ थॉट्स’ची उभारणी करायला हवी. इंदु मिलच्या जागेवर सुरू असलेले सुशोभीकरण व पुतळ््यासाठी शासनाने दिलेला सर्व निधी वाडिया रुग्णालयाला द्यावा. तसा आदेशच न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी आंबेकडर यांनी केली. ------------------‘नाईट लाईफ’ हवीचपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नाईट लाईफच्या भुमिकेचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी समर्थन केले आहे. ‘मी स्वत: नाईट लाईफचे आयुष्य जगलो आहे. महानगरांसह ज्या शहरांमध्ये दिवसा आठ ते दहा तासांचे काम करावे लागते, तिथे लोकांना दिवसा सामाजिक आयुष्यच नसते. त्यांना दिवसा वेळच मिळत नाही. त्यांना रात्रीच्या वेळ हे आयुष्य जगता यायला हवे. त्यामुळे नाईट लाईफला माझा पाठिंबा आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.--------------केंद्र सरकारे दारूड्यासारखे‘‘दारूड्याला मद्यपानासाठी पैसे मिळाले नाहीत की तो घरातील सर्व साहित्य विकायला सुरूवात करतो. तसे केंद्र सरकारने महसुली तुट भरून काढण्यासाठी भारत पेट्रोलियम ही अंडे देणारे कोंबडी तसेच इतर संस्था विकायला काढल्या आहेत. त्यामुळे हे सरकार दारूड्यासारखे वागत आहे,’’ अशी टीका अ‍ॅड. आंबेडकर यांनी केली.

...............

‘महाराष्ट्र बंद’ची हाकवंचित बहुजन आघाडीने एनआरसी, सीएए आणि एनपीआर विरोधात  २४ जानेवारीला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. ‘‘भाजपा, आरएसएससह काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्ष केवळ मुस्लिम समाजालाच फटका बसणार असल्याचे सांगत आहेत. हिंदुंनाही याचा फटका बसणार असल्याची भूमिका मीच मांडत आहे,’’ असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार