शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

दुष्काळात महाराष्ट्राला मदतीचा हात देऊ : मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 5:54 AM

अडीच लाख घरकुलांच्या चाव्यांचे वितरण; ‘साईबाबा समाधी शताब्दी’ महोत्सवाचा समारोप

शिर्डी : यंदा कमी पाऊस झाल्याने राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. राज्य सरकार त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेच, काही मदत लागलीच, तर महाराष्ट्राला पूर्ण साथ देऊ. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मदत करू, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. पर्यटनाला चालना देण्यासाठी शिर्डीतील विमानसेवेचा विस्तार करण्याची घोषणाही त्यांनी केली.

साईबाबांच्या समाधीच्या शताब्दी वर्षाची सांगता, शिर्डी संस्थानच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे राज्यात बांधल्या गेलेल्या अडीच लाख घरकुलांच्या चाव्यांचे वितरण अशा संयुक्त समारंभासाठी मोदी शिर्डीत आले होते. राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, जलसंधारणमंत्री राम शिंदे, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

राज्यातील विविध जिल्ह्यांतील लाभार्थ्यांशी आॅनलाइन संवाद साधत मोदी यांनी त्यांचा ई-गृहप्रवेशही केला. मोदी म्हणाले, दसऱ्यानिमित्त साईबाबांच्याभूमीत गरिबांना घराची भेट देता आली, याचा विशेष आनंद आहे. कोणत्याही योजनेत राजकीय स्वार्थ नसतो, तेव्हा ती योजना यशस्वी होते. पूर्वीच्या सरकारने अखेरच्या चार वर्षांत २५ लाख घरे बांधली, तर आम्ही चार वर्षांत सव्वा कोटी घरे बांधली.

पूर्वीच्या सरकारने अठरा तर आम्ही बारा महिन्यांत एक घर बांधले आहे. घराचा आकारही आम्ही वाढविला. त्याशिवाय घरासोबत वीज, पाणी, गॅस, शौचालय या सुविधाही दिल्या. आम्ही साफ नियतीने काम करतो.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी