शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
3
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
4
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
5
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
8
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
9
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
11
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
12
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
13
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
14
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
15
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
16
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
17
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
18
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
19
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
20
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका

CoronaVirus News: जादा लस, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरही द्या - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 02:56 IST

आता केंद्राने लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सिजन सिलिंडर तसेच व्हेंटिलेटरदेखील उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.

मुंबई : संपूर्ण देश कोरोनाशी लढत असताना महाराष्ट्र या लढ्यात मागे नव्हता आणि मागे राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून, आणखीही वाढविण्यात येत आहेत. आता केंद्राने लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सिजन सिलिंडर तसेच व्हेंटिलेटरदेखील उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत महाराष्ट्राची बाजू जोरदारपणे मांडली. ग्रामपंचायत निवडणुका, लग्न समारंभ यांच्या आयोजनाने साथ वाढली. अचानक विदर्भाच्या काही भागांतून विषाणूचा उद्रेक सुरू झाला व कुटुंबाच्या कुटुंब संसर्गग्रस्त झाली. राज्य सर्वसामान्य परिस्थितीत परतत असताना विषाणूच्या म्युटेशनमुळे संसर्ग वाढीस लागला. इतर जगातही असेच होत होते. त्यामुळे महाराष्ट्राने काळजी घेऊनही ही भयंकर वाढ झाली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आत्तापर्यंत राज्याला १ कोटी ६ लाख २३ हजार ५०० डोस मिळाले आहेत. आजपर्यंत ९२ ते ९५ लाख डोस देण्यात आले आहेत. आता या घडीला महाराष्ट्राकडे खूप कमी साठा असून, काही केंद्रे बंद पडली आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्यात एकूण चाचण्यात ७१ टक्के आरटीपीसीआर आणि २८ टक्के अँटिजेन टेस्ट होतात. हे प्रमाण समाधानकरक असले तरी वाढवावे, असे केंद्रीय आरोग्य सचिवांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले.हाफकिनमध्ये लस उत्पादनासाठी राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता द्या. २५ वर्षे वयावरील प्रत्येकाला लस देण्याची अनुमती द्या. जादा १२०० व्हेंटिलेटर द्यावेत, आदी मागण्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केल्या.कोरोना लढ्यात राजकारण नको : सर्वांना द्या समजकोरोनाच्या लढ्यात कोणत्याही पक्षाने राजकारण करू नये अशी समज आपण सर्व पक्षांना द्यावी, अशी मागणी ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली. राज्यात भाजप या मुद्यावर राजकारण करीत असल्याचे एकप्रकारे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी