समान कामास समान वेतन द्या - कन्हैय्या कुमार

By Admin | Updated: January 6, 2017 15:19 IST2017-01-06T15:13:05+5:302017-01-06T15:19:12+5:30

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. ६ - राज्यातील कंत्राटी सफाई कामगारांना समान कामास समान वेतन देण्याची मागणी करत कॉम्रेड कन्हैय्या ...

Give equal pay for equal work - Kanhaiya Kumar | समान कामास समान वेतन द्या - कन्हैय्या कुमार

समान कामास समान वेतन द्या - कन्हैय्या कुमार

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - राज्यातील कंत्राटी सफाई कामगारांना समान कामास समान वेतन देण्याची मागणी करत कॉम्रेड कन्हैय्या कुमारने किमान वेतनाच्या लढाईत उडी घेतली आहे. कामबंद आंदोलन करून आझाद मैदानात धडकलेल्या कचरा वाहतूक कर्मचाऱ्यांना संबोधताना कन्हैय्या कुमार बोलत होता.
सर्वोच्च न्यायालयाने समान कामास समान वेतन देण्याचे आदेश दिले आहेत. त्यात उच्च न्यायालयानेही मुंबईतील कंत्राटी कामगारांना कायम करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी सरकारने करावी, अशी मागणी कन्हैया कुमारने केली.

https://www.dailymotion.com/video/x844ng4

Web Title: Give equal pay for equal work - Kanhaiya Kumar