शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

औरंगाबादला डॅशिंग आयुक्त द्या- सतीश चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 20:25 IST

औरंगाबाद महापालिकेत ज्या पद्धतीने गोष्टी घडत आहेत ते पाहता आता तिथे राज्य सरकारला हस्तक्षेप करावाच लागेल. औरंगाबाद महापालिका बरखास्त करावी, ही मागणी तर आम्ही करतच आहोत. पण, त्याशिवाय एखादा तरुण, डॅशिंग आयुक्त औरंगाबादला पाठवा.

मुंबई : औरंगाबाद महापालिकेत ज्या पद्धतीने गोष्टी घडत आहेत ते पाहता आता तिथे राज्य सरकारला हस्तक्षेप करावाच लागेल. औरंगाबाद महापालिका बरखास्त करावी, ही मागणी तर आम्ही करतच आहोत. पण, त्याशिवाय एखादा तरुण, डॅशिंग आयुक्त औरंगाबादला पाठवा. निवृत्ती जवळ आलेला किंवा शिक्षा म्हणून औरंगाबादला आयुक्त पाठवल्यामुळेच औरंगांबाद महापालिकेत अनागोंदी कारभार सुरु असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सतीश चव्हाण यांनी केली.औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर विधान परिषदेत अल्पकालीन चर्चा झाली. यावेळी सतीश चव्हाण म्हणाले की, कच-याचा प्रश्न सुटेपर्यंत महापालिकेवर प्रशासक नेमण्यात यावा. तसेच मुख्यमंत्री कच-याचा प्रश्न सोडवण्यासाठी जो निधी देणार आहेत, तो खर्च करण्याची व्यवस्था करावी. घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेचे महापौर आणि नगरसेवक तीन वेळा परदेशात अभ्यास दौ-यासाठी जाऊन आले आहेत. यांचे परदेश दौरे झाले परंतु औरंगाबादचा कचरा प्रश्न तसाच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या नगरसेवक, महापौरांकडून परदेश अभ्यास दौ-याचा अहवाल मागून घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.खदाणीत कचरा टाकण्याचा पर्याय समोर मांडला जात आहे. मात्र, खदाणीमध्ये कचरा टाकला तर सहा किलोमीटरच्या परिघातील पाणी दुषित होण्याची शक्यता आहे. जसे नरेगाव येथे कच-यामुळे गावकरी त्रस्त झाले. त्याप्रमाणेच खदाणीच्या आजुबाजुला राहणा-या लोकांनाही त्रास होईल, असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Satish Chavanसतीश चव्हाणVidhan Parishadविधान परिषदAurangabadऔरंगाबाद