शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

पालघर परिसराला १६ एमएलडी पाणी द्या

By admin | Published: March 03, 2017 3:12 AM

पाण्याच्या कोट्यात १६ एम एल डी इतकी वाढ करावी आणि स्वतंत्र योजना कार्यान्वित करावी

पालघर : शहर व आजूबाजूच्या गावांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्याचे मुख्यालय, वाढता लोंढा आणि भविष्यात सिडकोच्या माध्यमातून होणारी नवीन पालघर वसाहत पाहता भविष्यात पाणीपुरवठा अपुरा पडणार असल्याने पाण्याच्या कोट्यात १६ एम एल डी इतकी वाढ करावी आणि स्वतंत्र योजना कार्यान्वित करावी अशी मागणी काँग्रेसचे केदार काळे यांनी पालक मंत्र्यांकडे केली आहे.प्रादेशिक नळपाणी योजनेतून पालघर शहरासह परिसरातील अन्य २६ गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा केला जातो. या योजनेतील २.०० एमएलडी पाणी इतर गावाना व उर्वरित ३.४८ एमएलडी पालघर नगरपरिषदेसाठी उपलब्ध करण्यात आले होते. आजही तेवढेच अपुरे पाणी पालघर शहराला मिळत आहे. शासनाच्या निकषांनुसार नागरी भागासाठी दरडोई ७० लिटर इतक्या पाण्याची गरज असतांना पालघरवासीयांना अपुऱ्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. म्हणून २६ गाव नळपाणी योजनेच्या गावाना दररोज १६ एम एल डी पाणी देण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे केदार काळे ह्यानी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा व खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगांकडे केली .तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती अधिनियम १९६५ चे कलम ५० अन्वये पाणी पुरवठायोजना तयार करणे नगरपरिषदेला बंधनकारक आहे म्हणून नविन स्वतंत्र योजना फक्त नगरपरिषदेसाठी तयार करण्यात यावी व आसपासच्या गावपाड्यांसाठी वेगळी पाणीपुरवठा योजना करावी अशी ही मागणी काळे यांनी केली आहे. (वार्ताहर)>लोकसंख्या गेली लाखांवर२००१ च्या जन गणनेनुसार पालघरची लोकसंख्या ५२ हजार ६७० इतकी असली तरी २०११ च्या जन गणाने नुसार ती ६८ हजार ८८५ इतकी झाली आहे. तर तरंगती लोकसंख्या पकडून ती १ लाखापर्यंत पोहचली आहे.नळपाणी योजना मंजूर करताना या योजने साठी दररोज ५.४८ एम एल डी पाण्याचा कोटा मंजूर करण्यात आला आहे.