शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
2
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
3
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
4
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
5
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
6
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
7
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
8
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
9
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
10
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
11
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
12
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
13
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
14
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
15
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
16
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
17
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
18
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
19
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
20
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
Daily Top 2Weekly Top 5

कन्या शाळा आता होणार सहशिक्षण शाळा; शिक्षण आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:50 IST

 ७ ऑक्टोबर रोजी शिक्षण विभागाने याबाबत निर्णय जाहीर केला असून शिक्षक व शिक्षण तज्ज्ञांनी सहशिक्षणाच्या  निर्णयाचे स्वागत केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सन २००० पासून स्वतंत्र कन्या शाळा अस्तित्वात असता कामा नये असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्या निकालाच्या अनुषंगाने शासनाने आता धोरण ठरवले असून आता वीस वर्षांतील कन्या शाळा इतिहासजमा होणार आहेत. या शाळांचे रूपांतर सहशिक्षण शाळांमध्ये होणार आहे.  ७ ऑक्टोबर रोजी शिक्षण विभागाने याबाबत निर्णय जाहीर केला असून शिक्षक व शिक्षण तज्ज्ञांनी सहशिक्षणाच्या  निर्णयाचे स्वागत केले आहे.

उच्च न्यायालयाच्या निकालानुसार सहशिक्षण अनिवार्य, समानतेचे वातावरण तयार होणार चाळीस वर्षांपूर्वी मुलींची शिक्षणात उपस्थिती कमी होती. म्हणून तत्कालीन गरज ओळखून शासनाने स्वतंत्र कन्या शाळांना मान्यता दिली. परंतु परिस्थिती बदलत गेली आणि मुलींचे शिक्षणातील प्रमाण वाढू लागले. सहशिक्षणाचे वारे वाहू लागले. 

उच्च न्यायालयाच्या निकालानुसार सहशिक्षण अनिवार्य आहे. त्यामुळे सन २००० पासून ज्या शाळांनी स्वतंत्र मुलींच्या शाळा सुरू केल्या असतील, त्यांना आता सहशिक्षण युनिट म्हणून शिक्षण आयुक्तांकडून त्वरित मान्यता घ्यावी लागेल. नवीन शैक्षणिक धोरणामध्येही केंद्र शासनाने सहशिक्षण हा शाळेचा गाभा असल्याचे स्पष्ट केले. तसेच सहशिक्षणामुळे स्त्री-पुरुषांमध्ये समानतेचे वातावरण तयार होते. लिंगभेद नष्ट होतात आणि समाजाची वाढ निरोगी पद्धतीने होते. त्यामुळेच शासनाच्या बहुतांशी शाळा या सहशिक्षण देत असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मुलींच्या टक्का वाढावा, ही पूर्वी कन्या शाळांची गरज होती. परंतु आता सहशिक्षण ही काळाची गरज आहे.डॉ. श्रुती पानसे, मानसोपचार तज्ज्ञ

आजही सार्वजनिक सभेत स्त्रियांची रांग एका बाजूला आणि पुरुषांची रांग एका बाजूला असे व्हायला नको. त्यामुळे एका वर्गात आणि एकाच शाळेत सहशिक्षणाच्या माध्यमातूनच शिक्षण मिळायला हवे.भाऊ गावंडे, माजी सहशिक्षण संचालक

कुटुंबामध्ये स्त्री-पुरुष एकत्र वावरतात. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी स्त्री पुरुष समतेचा मार्ग दाखविला. सहशिक्षणाशिवाय परस्पर सामंजस्य आदर आणि परिस्थितीचे समायोजन कळणार नाही. त्यामुळे सहशिक्षण आवश्यक आहे.महेंद्र गणपुले, माजी अध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना 

English
हिंदी सारांश
Web Title : Girls' schools to become co-ed; Education Commissioner's permission needed.

Web Summary : Girls' schools established post-2000 must transition to co-ed, following a High Court ruling. The education department's decision emphasizes equality and societal benefits. Experts welcome the move, highlighting the importance of co-education for mutual respect and understanding.
टॅग्स :Schoolशाळा