कपाटाखाली चिरडून मुलीचा मृत्यू

By Admin | Updated: July 4, 2016 22:09 IST2016-07-04T22:09:18+5:302016-07-04T22:09:59+5:30

भिंतीला लावलेले कपाट अंगावर पडल्याने चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी पूर्वेकडील स्टार कॉलनी येथे घडली.

The girl's death in the cupboard, crushed | कपाटाखाली चिरडून मुलीचा मृत्यू

कपाटाखाली चिरडून मुलीचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

डोंबिवली, दि. 4- भिंतीला लावलेले कपाट अंगावर पडल्याने चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी पूर्वेकडील स्टार कॉलनी येथे घडली. कार्तिक दर्शन इमारतीत बाळू राठोड हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांची चार वर्षीय मुलगी जिया ही झोपली होती. याचवेळी भिंतीला लावलेले कपाट तिच्या अचानक अंगावर पडले. यात जबर जखमी झालेल्या जियाला तात्काळ उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

Web Title: The girl's death in the cupboard, crushed