शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

'त्या' मुलीवर फेकले उकळते तेल, प्रेमप्रकरणातून घडली घटना, आरोपीने दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 17:41 IST

एका अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडल्याच्या वृत्ताने राज्यभरात खळबळ उडाली. मात्र, त्या तरुणीवर उकळते तेल फेकल्याची कबुली पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी दिली आहे.

अमरावती  - एका अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडल्याच्या वृत्ताने राज्यभरात खळबळ उडाली. मात्र, त्या तरुणीवर उकळते तेल फेकल्याची कबुली पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी दिली आहे. प्रेमप्रकरणातून एका तरुणाने हे कृत्य केल्याचे उघड झाले.या प्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी सुशील विलास मेश्राम (२०, रा. बोकुलखेडा, भातकुली) व भूषण हरिश्चंद्र उईके (१९,रा. सुकळी बनारसी) यांना मंगळवारी मध्यरात्रीनंतर अटक केली. शाळा सुटल्यानंतर पीडित मुलगी मैत्रिणीसोबत शिवटेकडीकडून काँग्रेसनगर मार्गेे घरी जात होती. दरम्यान  दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी थर्मासमधील उकळते पदार्थ शाळकरी मुलीच्या अंगावर फेकून पळून गेले. त्यामुळे ती मुलगी १६ टक्के भाजली गेली. तिला काही नागरिकांनी तत्काळ इर्विन रुग्णालयात दाखल केले. मुलीवर अ‍ॅसिडहल्ला झाल्याचे वृत्त शहरात वाºयासारखे पसरले. या घटनेमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी तत्काळ पीडित मुलगी व तिच्या मैत्रिणीच्या माहितीवरून आरोपी तरुणांचा शोध घेतला. मंगळवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांनी पाच तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यापैकी सुशील मेश्राम व भूषण ऊईके यांनीच मुलीच्या अंगावर उकळते तेल फेकल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३२६ अन्वये गुन्हा नोंदविला. 

अशी आहे घटनेची सत्यता एप्रिल महिन्यात बेलपु-यातील एका लग्न समारंभात आरोपी सुशील मेश्राम व पीडित मुलीची ओळख झाली. सुशीलचे त्या मुलीवर एकतर्फी प्रेम जडले. दोघेही मोबाईलवर एकमेकांशी संवाद साधत होते. पीडित मुलगी दुस-या तरुणांशी बोललेली सुशीलला आवडत नसे. या विषयावर त्यांच्यात वाद झाला. त्या मुलीने सुशीलच्या कानशिलात लगावली होती. नेमका तोच राग सुशीलच्या मनात होता. त्यामुळे त्याने मुलीच्या अंगावर उकळते तेल फेकण्याचा प्लॅन रचला. मंगळवारी घटनेच्या दिवशी सुशीलने त्याचा मित्र भूषणच्या माध्यमातून एका मित्राची एमएच २७ बीएच ७३५७ क्रमांकाची दुचाकी बोलावली. दुचाकीची ओळख न पटण्यासाठी सुशीलने त्यावरील क्रमांकावर लाल रंगाचे स्टिकर्स चिपकविले आणि दोघेही हेल्मेट घालून घटनास्थळाच्या दिशेने गेले. दरम्यान, त्यांनी एका दुकानातून थर्मास विकत घेतला आणि श्यामनगरातील ओळखीच्या महिलेकडे गेले. गाडीच्या शॉकअपमध्ये गरम तेल टाकायचे असल्याचा बहाणा करून त्यांनी त्या महिलेकडे कढईत तेल गरम केले. उकळते तेल सुशीलने थर्मासमध्ये भरले. बाहेर दुचाकीवर उभा असलेल्या भूषणला घटनास्थळाच्या दिशेने चालण्यास सांगितेल. पीडित मुलगी शाळेतून घरी जात असताना सुशीलने तिच्या अंगावर उकळते तेल फेकले. 

थर्मास, कढई, हेल्मेट, कपडे, दुचाकी जप्तसुशील हा बी.ए. तृतीय वर्षाला शिकतो. भूषण वाहन दुरुस्तीचे काम करतो. या दोघांनी वापरलेले हेल्मेट, थर्मास, कढई, दोघांचेही कपडे, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली. 

मे महिन्यात राजापेठला तक्रारसुशीलचा एकतर्फी प्रेमप्रकरणातील वाद राजापेठ पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. यासंबंधाने पीडित मुलीने मे महिन्यात सुशीलविरुद्ध तक्रार नोंदविली होती. त्यावेळी दोघांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी बोलावून समज दिली होती. दोघांचाही वाद सामंजस्याने मिटविला होता.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक