गरिबाची लेक हाेणार लखपती; सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 06:37 IST2023-10-11T06:36:28+5:302023-10-11T06:37:28+5:30
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या कुटुंबात १ एप्रिल २०२३ नंतर जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.

गरिबाची लेक हाेणार लखपती; सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना
मुंबई : मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
या योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, सहावीत गेल्यावर सात हजार रुपये, ११वीत गेल्यावर आठ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये अशा रीतीने त्या मुलीस एकूण एक लाख एकहजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे.
काेणाला मिळणार फायदा?
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या कुटुंबात १ एप्रिल २०२३ नंतर जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.