मुलीचे अपहरण करणाऱ्यास अटक
By Admin | Updated: July 4, 2016 04:46 IST2016-07-04T04:46:27+5:302016-07-04T04:46:27+5:30
भार्इंदर पश्चिमेच्या एका मोठ्या झोपडपट्टीत राहणारी १३ वर्षांची मुलगी सातवी इयत्तेत शिकते

मुलीचे अपहरण करणाऱ्यास अटक
मीरा रोड : भार्इंदर पश्चिमेच्या एका मोठ्या झोपडपट्टीत राहणारी १३ वर्षांची मुलगी सातवी इयत्तेत शिकते. १ जुलैला ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली. संध्याकाळ झाली तरी ती शाळेतून घरी न आल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. पण, तिचा काही शोध लागला नाही. पालकांनी या प्रकरणी भार्इंदर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित टेलर व सहकाऱ्यांनी तपास सुरू केला. तपासात मुलगी राहत असलेल्या भागातीलच १९ वर्षीय तरुणावर संशय बळावला. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असता शनिवारी तो आरोपी मुलीसह दादर रेल्वे स्थानकात सापडला. आरोपीला अटक करून मुलीची त्याच्या तावडीतून सुटका करण्यात आली. तो मुलीला उत्तर प्रदेशला घेऊन जाणार होता. (प्रतिनिधी)