टीव्ही पाहू न दिल्याने मुलीने जाळून घेतले !
By Admin | Updated: September 15, 2015 01:42 IST2015-09-15T01:42:28+5:302015-09-15T01:42:28+5:30
आईने टीव्ही पाहू न दिल्याचा राग मनात धरुन सोमवारी एका मुलीने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. भाजल्याने गंभीर जखमा

टीव्ही पाहू न दिल्याने मुलीने जाळून घेतले !
अंबाजोगाई (जि. बीड) : आईने टीव्ही पाहू न दिल्याचा राग मनात धरुन सोमवारी एका मुलीने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. भाजल्याने गंभीर जखमा झालेल्या या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आदिती मेहेंद्रे (१४) असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून ती आठवीत शिकत होती. सोमवारी सकाळी आदिती घरात टीव्ही पाहत बसली होती. तिच्या आईने तिला टीव्ही पाहू नकोस. अभ्यास कर, असे सांगून टीव्ही बंद करायला लावला. आईने टीव्ही बंद करायला लावल्याचा राग मनात धरून आदिती घराच्या छतावर गेली. तिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.
छतावर काहीतरी पेटल्याचे शेजाऱ्यांना दिसल्याने त्यांनी तातडीने तिकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत आदिती पूर्णपणे भाजली होती. शेजाऱ्यांनी तिला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असतानाच दुपारी ४ वाजता तिचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)