गिरीश महाजनांनी राजीनामा द्यावा - पवार

By Admin | Updated: May 26, 2017 05:19 IST2017-05-26T05:19:54+5:302017-05-26T05:19:54+5:30

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकाच्या लग्नाला जाण्याचा प्रकार गंभीर आहे.

Girish Mahajan should resign - Pawar | गिरीश महाजनांनी राजीनामा द्यावा - पवार

गिरीश महाजनांनी राजीनामा द्यावा - पवार

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकाच्या लग्नाला जाण्याचा प्रकार गंभीर आहे. महाजन यांनी यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न न करता मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी पुण्यात केली.
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, भाजपा व शिवसेनेच्या नेत्यांनी शरद पवार यांचे ‘दाऊद’शी संबंध असल्याचे खोटे आरोप करून त्यांची बदनामी केली होती. परंतु, पुरोगामी महाराष्ट्रातील महाजन यांच्यासारख्या मंत्र्याने दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्नाला जाऊन चुकीचे कृत्य केले आहे. वादग्रस्त व्यक्तींच्या कार्यक्रमाला मंत्र्यांनी जाऊ नये.
याबाबत पोलिसांकडून मंत्र्यांना कळविले जाते. मात्र,तसेच काहीच झाले नाही. उलट मला काहीच माहिती नव्हते,असे वक्तव्य करून महाजन यातून अंग झटकण्याचा प्रयन करत आहेत. या घटनेचा पश्चाताप म्हणून महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
लवासाचे नियंत्रण पीएमआरडीकडे देण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय कायदेशीर असल्याचे पवार यांनी नमूद केले.

Web Title: Girish Mahajan should resign - Pawar