शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नाथाभाऊ भाजपात परतण्याची चर्चा; गिरीश महाजनांचे सूचक भाष्य, म्हणाले, “जेव्हा ते येतील...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 14:13 IST

BJP Girish Mahajan News: एकनाथ खडसे भाजपात परतणार असल्याच्या चर्चांवर गिरीश महाजन यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.

BJP Girish Mahajan News: गेल्या काही दिवसांपासून भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपात परत येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या चर्चा सुरू असतानाच एकनाथ खडसे यांनी दिल्ली दौरा केला. त्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले, असे सांगितले गेले. या घडामोडींवर भाजपा नेते गिरीश महाजन यांनी सूचक शब्दांत भाष्य केले.

खडसे यांचे कुटुंब नेहमीच संभ्रम निर्माण करते. आताही भाजपमध्ये येणार- येणार अशा चर्चा असल्या, तरी ते येतील, तेव्हा आम्ही आमच्या खास कार्यशैलीने त्यांचे स्वागत करू, असे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ज्यावेळी येतील तेव्हा ठरवू. हे सर्व जर तरचे प्रश्‍न आहेत. त्याला काहीही अर्थ नाही. अजूनही त्यासंदर्भात कुठलीही वाच्यता नाही. भाजपा प्रवेश करणार, हे समाजमाध्यमांतून आणि प्रसारमाध्यमांतून येत आहे. ते येतील तेव्हा त्यांचे कसे स्वागत करायचे, ते तेव्हाच बघू, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील आणि रक्षा खडसे यांची भेट घेतली

रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात एकमेकांविषयी असलेल्या नाराजीबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, त्या दोघांची भेट घेतली. मी त्यांना सांगितले, आपल्याला निवडणुकीत सोबत काम करावे लागेल. महायुतीचा घटकपक्ष म्हणून आपण सोबत आहोत. आपणही शिंदे गटात आहात. चंद्रकांत पाटील आमच्यासोबत आता आहेत. आपण व आपले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते निवडणुकीत रक्षा खडसेंसोबत राहावे, असे पाटील यांना चर्चेवेळी सांगितले. आता मला वाटते, त्यांनी ते मान्य केले आहे. त्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम करायचे आहे. मतदान कमळालाच करायचे आहे, अशी ग्वाही दिली. ते गेल्यानंतर रक्षा खडसे यादेखील येऊन भेटल्या, असे महाजन यांनी सांगितले.

 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनeknath khadseएकनाथ खडसेBJPभाजपा