शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:43 IST

BJP Girish Mahajan News: आम्हालाही पक्ष वाढवायचा आहे. आमचे उद्दिष्ट ठरलेले आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

BJP Girish Mahajan News: मागील काही दिवसांपासून नाशिकमधील उद्धवसेनेचे निलंबित वादग्रस्त नेते सुधाकर बडगुजर हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. सुधाकर बडगुजर यांचा मुंबई भाजपा कार्यालयात मोठ्या उत्साहात पक्ष प्रवेश झाला. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, काँग्रेस आणि ठाकरे गटाने या पक्ष प्रवेशावरून भाजपावर जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे, सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशामुळे भाजपाची ताकद वाढली आहे, असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. 

पत्रकारांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, आम्हालाही पक्ष वाढवायचा आहे. आम्हाला पुन्हा महापालिका ताकदीने लढायची आहे. आमचे उद्दिष्ट ठरलेले आहे. ज्यांना पक्षात घेतले, ते अनेकदा निवडून आलेले आहेत. काही वाद-विवाद असतील ते मिटवले जातील. आमच्या पक्षामध्ये मंत्री असलेले अनेक जण मागच्या काळात टीका करत होते. पण आता ते सगळे एकरूप झालेले आहेत. सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश झाला तो भारतीय जनता पक्षासाठी फायदेशीर आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. 

आमच्यात कुठेही मनभेद, मतभेद नाही

सुधाकर बडगुजर यांचा भाजपा प्रवेश होणार आहे का, याबाबत माहिती असे भाजपा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. परंतु, सुधाकर बडगुजर यांच्या प्रत्यक्ष भाजपा प्रवेशावेळी स्वतः चंद्रशेखर बावनकुळे हजर झाले. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यावर गिरीश महाजन यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. थोडे मिस कम्युनिकेशन झाल्याने अशी गोष्ट घडली. हा घरचा कार्यक्रम होता. तारखेत संभ्रम होता. अचानक निर्णय झाला आणि हा पक्षप्रवेश झालेला आहे. त्यामुळे आमच्यात कुठेही मनभेद किंवा मतभेद नाही, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, भाजपात प्रवेश झाला आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडू. मला वर्तमान काळात काम करायचे आहे आणि भविष्य घडवायचे आहे, अशी प्रतिक्रिया सुधाकर बडगुजर यांनी दिली.

 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपाShiv Senaशिवसेना