शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चला, आपला बायोडेटा अपडेट करा ! महाकाय कंपन्यांना हवेय ग्रामीण भागातील टॅलेन्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 08:11 IST

वर्क फ्रॉम होमची सुविधा कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर, अनेक कंपन्यांनी विद्यमान कर्मचाऱ्यांच्या वेतनाची पुनर्रचना केली आहे. यामध्ये प्रवास भत्त्याऐवजी, संगणक, इंटरनेट किंवा घरातून कामकाज सुलभ होण्यासाठी घरात अनुषंगिक इंटिरियरचे बदल करण्यासाठी काही भत्ते दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  केवळ निवाऱ्याची सोय नसल्यामुळे किंवा मिळणाऱ्या पगारातील मोठा हिस्सा निवाऱ्याच्या सोयीसाठी जात असल्यामुळे मेट्रो शहरातील नोकरीची संधींचा विचारही न करू शकणाऱ्या अनेकांना कोरोनामुळे आता दिलासा मिळाला आहे. अस्मानी संकट ठरलेला कोरोना ही संधी कशी?, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मात्र, कोरोनामुळे अनेक उद्योगांनी पुढची किमान तीन वर्षे वर्क फ्रॉम होमचे मॉडेल स्वीकारल्यामुळे, आता केवळ एखाद्या विशिष्ट शहरातील लोकांनाच संधी देण्याऐवजी, उत्तम दर्जाचे टॅलेंट मिळविण्यासाठी आपले अवकाश आता द्वितीय, तृतीय श्रेणीतील नागरी भाग, अन् खेड्यांच्या दिशेनेही विस्तारले आहे. परिणामी, घरी बसून आपल्या बायोडेटावर महाकाय कंपन्यात काम करण्याचा अनुभव जोडण्याची संधी तरुणांना प्राप्त झाली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होमचे मॉडेल रुजले. यामधे माहिती तंत्रज्ञान, वित्तीय व्यवस्थापन, व्यवसाय व्यवस्थापन, विमा उद्योग, डिझायनिंग, इंजिनिअरिंग, संशोधन-विकास अशी क्षेत्र अग्रेसर असून, या कंपन्यांनी आणखी किमान तीन वर्षे वर्क फ्रॉम मॉडेल सुरू ठेवण्याचे नियोजन केले आहे. या माध्यमातून कंपनीचे काम पुढे नेतानाच, आपल्या विस्तार योजनेसाठी नवीन कर्मचाऱ्यांची भरती करताना नागरी आणि ग्रामीण भागातील लायक उमेदवारांचा शोध सुरू केल्याची माहिती टॅलेंट हंट रिसर्च संस्थेचे अधिकारी अभिनिष सचदेव यांनी दिली. या अनुषंगाने महाराष्ट्राचा विचार करायचा तर, टॅलेंट हंट करणाऱ्या कंपन्यांनी मुंबई, पुणे, ठाणे याच्या पुढे जात आपल्याकडे सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नांदेड अशा विविध शहरातून आलेल्या बायोडेटाची चाळणी सुरू केली आहे.  

टॅलेंट हंट कंपन्यांकडे दररोज शेकडो बायोडेटा येत असतात. याचबरोबरीने, नोकरीची संधींची माहिती देणाऱ्या विविध पोर्टलवरदेखील मोठ्या प्रमाणावर बायोडेटा अपलोड होत असतात. जॉब्स पोर्टलवरील जाहिरातींचा ट्रेंडही बदलला असून, बहुतांश कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय देत, अर्ज सर्व शहरांसाठी खुले असल्याचे सुचित केले आहे. या माध्यमातून ज्यांची निवड मुलाखतीसाठी होते, त्या मुलाखती, अनुषंगिक परीक्षा असे सारेच ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे प्रत्यक्ष कर्मचारी आणि व्यवस्थापन यांची समोरासमोर भेट होण्याचीही गरज उरली नसल्याचे, मनुष्यबळ विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुमित्रा कृष्णमृर्ती यांनी सांगितले. हा ट्रेंड जसा देशांतर्गत पातळीवर दिसून येत आहे, तसाच तो ट्रेंड जागतिक पातळीवर दिसून येत आहे. माहिती तंत्रज्ञान आणि वित्तीय व्यवस्थापन क्षेत्रात चांगला अनुभव असलेल्या लोकांना भारतात बसून परदेशी कंपन्यात काम करणे शक्य झाले आहे. 

नागरी, ग्रामीण भागातही होणार मुलाखतीआयआयटी, आयआयएम किंवा काही प्रमुख महाविद्यालयातील विद्यार्थांना कंपनीत घेण्यासाठी कॅम्पस रिक्रूटमेंटचा पर्याय आता नवा नाही. मात्र, अनेक कंपन्यांनी आता मुंबई, पुण्यापुरतेच मर्यादित न राहता, सांगली, कोल्हापूर, धुळे, नांदेड, नाशिक, चिपळूण, रत्नागिरी, अहमदनगर अशा शहरातील इंजिनिअरिंग, व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांशी संपर्क करण्याची योजना आखली आहे. चालू शैक्षणिक वर्ष संपतेवेळी येथील मुलांची यादी तयार करत त्यांच्या मुलाखती घेत त्यांना संधी देण्याची योजना आहे. 

वर्क फ्रॉम होमसाठी सुविधावर्क फ्रॉम होमची सुविधा कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर, अनेक कंपन्यांनी विद्यमान कर्मचाऱ्यांच्या वेतनाची पुनर्रचना केली आहे. यामध्ये प्रवास भत्त्याऐवजी, संगणक, इंटरनेट किंवा घरातून कामकाज सुलभ होण्यासाठी घरात अनुषंगिक इंटिरियरचे बदल करण्यासाठी काही भत्ते दिले आहेत. नवीन कर्मचारी रुजू करून घेतानादेखील त्याच्या वेतनात अशाच पद्धतीने रचना करण्यात येत आहे. वर्क फ्रॉम होममुळे कार्यालयाचे भाडे, वीज, इंटरनेट, कर्मचारी सुविधा अशा खर्चात कंपन्यांची बचत होत असल्यामुळे, या बचतीचा काही भाग     वेतनवाढीच्या रूपाने देण्याकडेही काही कंपन्यांचा कल आहे.

टॅग्स :jobनोकरी